महावितरण कंपनी यांनी तात्काळ रोहित्र बदलून दिले

Beed

महावितरण कंपनी यांनी  तात्काळ रोहित्र बदलून दिले 

बीड/सय्यद इरफान

शहरातील मोमीन पुरा मिल्लत नगर या भागातील विद्युत पुरवठा  रात्री खंडित झाला होता.उन्हाळ्याच्या या उकाळा आणि एन रमजानव संचार बंदीच्या काळात सर्वच नागरीक घरात असल्याने आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होऊ लागला होता.लहान बालके आणि वयोवृद्धासह नागरिकांना प्रचंड त्रास होऊ लागला.

या भागातील मोमीन जूबेर यांनी तात्काळ महावितरण कंपनीच्या अधिकारी इंजिनियर शिवाजी आहेर  यांच्याशी संपर्क केला व त्यांनी तात्काळ येऊन पाहणी केली असता त्याठिकाणी डीपी (रोहीञ)खराब झाल्यास समजले.
महावितरण कंपनीच्या अधिकारी यांनी डीपी (रोहीञ)तात्काळ  बदलून दिले.
महत्वाची गोष्ट म्हणजे महावितरण कंपनीने आपले  कर्तव्य ताबडतोब  पार पाडलेमहावितरणचे  इंजिनिअर शिवाजी आहेर सय्यद फजलोद्दीन यांनी  काम यशस्वी केले कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सगळेच कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत या ठिकाणी पाहायला भेटले.नागरिकांनी पन घरात राहुन आपला कर्तव्य पार पाडले पाहिजे.

Sharing

Visitor Counter