रमजान ईद ची नमाज घरातच अदा करण्यात यावी-इंजिनीयर सादिक इनामदार

Dharur

रमजान ईद ची नमाज घरातच अदा करण्यात यावी-इंजिनीयर सादिक इनामदार

किल्ले धारुर/इरफान शेख

 कोरोनाव्हायरसच्या महामारी मुळे सर्व जग हैराण आहे ,या भयंकर विषाणूंवर नियंत्रण करण्यासाठी आपल्या देशात गेल्या दोन महिन्यापासून लॉक डाऊन सुरू असून केंद्र सरकार व राज्य सरकार या लढ्यात आपली यशस्वी भूमिका राबवित आहे .गेल्या दोन महिन्यापासून देशातील सर्वधर्मीय समाजबांधवांनी शासन प्रशासनाला सहकार्य करत आपले प्रत्येक सण उत्सव जयंत्या रद्द केल्या किंवा आपल्या घरात साध्या पद्धतीने पार पाडल्या .रमजानच्या पूर्ण महिन्यात देशभरातील मुस्लिम बांधवांनी रोजे उपवास ठेवत आपल्या घरातच नमाज पठण केली. सद्या महाराष्ट्रात कोरोना चा प्रादुर्भाव खूप वाढलेला असून आता सर्व जनतेला याविषयी अधिक काळजी घेण्याची वेळ आलेली आहे .येत्या सोमवारी पवित्र रमजान महिन्याच्या अंती साजरा केल्या जाणाऱ्या ईद-उल-फित्र हा सण असून दरवर्षी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव इदगाह वर जाऊन नमाज पठण करतात , हिंदू मुस्लिम बांधव एक दुसऱ्यांना गळाभेट करून शुभेच्छा देतात परंतु बंधूनो आता वेळ खूप नाजूक आहे कोरोना विषाणूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी व हे युद्ध लढण्यासाठी आपण सर्वांना घरातच राहणे अनिवार्य आहे व शासन-प्रशासन कडून येणाऱ्या विविध सूचना चे पालन करणे आवश्यक आहे . येणाऱ्या सोमवार रोजी सर्वांनी ईदचा नमाज घरातच अदा करावा, घरातूनच समाज माध्यमाद्वारे एक दुसऱ्यांना शुभेच्छा द्यावेत .गळाभेट करू नये हात मिळवु नये, घरातच राहून सुरक्षित राहावे जेणेकरून शासनाला या विषानुवर नियंत्रण करण्यास लवकरात लवकर यश येईल. सर्वांनी देश हित पुढे ठेवून वर्तन करावे आपल्यामुळे आपल्या समाजाचे धर्माचे किंवा शहराचे नाव खराब होऊ नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष  इंजिनीयर सादिक इनामदार यांनी केले आहे

Sharing

Visitor Counter