दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक उपक्रम कार्यक्रम घेऊन साजरी करणार -आशीष कुमार चव्हाण

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक उपक्रम कार्यक्रम घेऊन साजरी करणार -आशीष कुमार चव्हाण
बीड/वार्ताहर
गेली दोन-तीन वर्ष कोरोना संसर्गामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेडकरी जनतेला साजरी करता आली नाही आम्ही दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम स्पर्धेच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम घेत असताना कोरोना संसर्गामुळे यात खंड पडला पण या वर्षी कोरोना संसर्ग कमी झाला असल्याने सरकारने सर्व निर्बंध उठून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होऊ देणार अशी घोषणा केली याचे आम्ही स्वागत करतो प्रत्तेक वर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त सदभावना दौड(मॅरेथॉन), राज्यनाट्य बहुजन एकांकिका स्पर्धा ,जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा ,जिल्हास्तरीय भीम गीत गायन स्पर्धा आतापर्यंत आम्ही आयोजित करत आलो आहोत यात सर्व बहुजन समाजाचे स्पर्धक व कलाकार या सर्वांनी सहभाग नोंदवला याहीवर्षी भीम गीत गायन स्पर्धा व जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा(डॉ, बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या जीवनातील कोणत्याही घटनेवर) आयोजित करण्याचा मानस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आता यावर्षी 23/04/2022 ते 24/04/2022 रोजी आजाद समाज पार्टी( कांशीराम) बिड जिल्ह्या च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन बीड येथे करण्यात येणार आहे तरी जिल्हास्तरीय भीम गीत गायन स्पर्धेसाठी व जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेसाठी इच्छुकांनी 9921145139/ 7972107663 /8177817763 /9822051321या क्रमांकावर संपर्क साधावा