स्टार्ट-अप नाविन्यता आधारित ज्ञान या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करावेत

स्टार्ट-अप नाविन्यता आधारित ज्ञान या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करावेत
बीड/वार्ताहर
बीड : स्टार्टअप आणि नाविन्यतापूर्ण कल्पनांना पांठिबां देण्याच्या उद्देशाने महाराष्ट राज्य नाविन्यता सोसायटी या सिस्को लाँचपेंड (Cisco Launchpad) च्या सहकार्याने भारताच्या टेक्नोप्रेन्योरशिप पालिकेच्या महाराष्ट्र आवृतीचे आयोजन करत असून त्यानुसार सुरुवातीच्या टप्प्यात तरुण विद्यार्थ्यांसाठी स्टार्ट-अप व्यवसाय उद्योजकांसाठी आधारित ज्ञान सत्र् आणि तंत्र्ज्ञान आयोजित केले आहे. जेथे शीर्ष नवोदित आणि स्टार्ट अप्सना त्यांच्या कल्पना संबधित भागधारकापर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल. ज्ञान सत्र् उद्योग आणि पर्यावरणातील तज्ज्ञाव्दारे दि. 25 एप्रिल ते 29 एप्रिल 2022 व 2 मे ते 6 मे 2022 या कालावाधीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाव्दारे महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीव्दारे एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचे उदिष्ट ठेवले आहे. जेथे नवोदित आणि उद्योजकांना त्यांची कल्पना कशी तयार करावी. टिकवून ठेवावी, विस्तारित व्हावी आणि मोठे कसे करावे याचे ज्ञान दिले जाणार आहे. तसेच या कार्यक्रमात उत्पादन विकास डिझाईन विचार, तंत्रज्ञान व आर्थिक व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवसापन व्यवयास ज्ञानाचा एक भाग म्हणून निधि कसा उभारावा यासारख्या वितृत विषयांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्यतील उत्सुक उद्योजक, विद्यार्थी आणि सुरवातीच्या टप्प्यातील स्टार्ट-अपचे संस्थापक यांनी अर्ज सादर करावेत. तसेच या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी स्टार्ट-अप आणि त्यांच्या इकोसिस्टमबद्दल मौल्यावाण माहिती मिळवण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी https: //msins.in/या वेबसाईटला भेट देऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी बीड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रत्येक्ष संबधित कार्यालयास अथवा 02442-222348 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.