बाहेरील व्यापारी ग्राहक येत आसल्याने वाळकेश्वर येथील आठवडी बाजार उठवला

बाहेरील व्यापारी ग्राहक येत आसल्याने वाळकेश्वर येथील आठवडी बाजार उठवला,
शहागड/प्रतिनिधी
अबंड तालुक्यातील लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून आजपर्यंत शहागड ता.अंबड येथील गुरूवारचा आठवडी बाजार बंद आहे.
तेव्हा पासून छोटे-मोठे व्यावसायिक वाळकेश्वर च्या मुख्य रस्त्यावर भाजी विक्रीचे हातगाडे लावत होते. तर काहि दिवसांपासून व्यावसायिकांनी दर गुरुवारी शहागडचा आठवडी बाजार वाळकेश्वर च्या मुख्य रस्त्यावर भरवण्यास सुरुवात केली होती. ज्यामुळे वाळकेश्वर च्या मुख्य रस्त्यावरील गर्दी वाढली व रहदारीस अडथळा निर्माण होत होता. तसेच तालुक्यातील कुठेही आठवडी बाजार भरत नसल्याने पंचक्रोशीतील लोकं वाळकेश्वर च्या मुख्य रस्त्यावरील आठवडी बाजारात एकच गर्दी करत होते. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याने बाहेरून आलेल्या पासून कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव होऊ शकतो यामुळे वाळकेश्वरवासियांच्या उरात धडकी भरली होती. बुधवारी गावातील काही सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, प्रशांत जाधव व इतर काही तरुणांनी गुरूवारचा आठवडी बाजार न भरून देणे बाबत ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले होते. तसेच तहसीलदार व पोलिसांना याबाबत कळविले होते.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या सुचनेनंतरही भाजी विक्रेत्यांनी गुरूवारी दुकाने थाटून बाजार भरवला होता. व्यापाऱ्यांची ऐकण्याची मानसिकता नसल्याने सरपंच मधुकर मापारी, ग्रामसेवक सुरेश धोत्रे, जमादार अख्तर शेख यांनी भाजी विक्रेत्यांना कारवाईचा कडक ईशारा देत भरलेला आठवडी बाजार उठवला. यामुळे भाजी विक्रेत्यांनी रोष व्यक्त केला असला तरी, तरी बाहेरील भाजीपाला विक्रीते,ग्राहाक,रहिवासी नागरीक गर्दी करत आसल्याने वाळकेश्वर वासीयांच्या आनेक तक्ररारी होत्या बाजार उठवल्या नतंर तुरळक भाजीपाला विक्रीत्यांनी शहागड मुख्य रस्त्यावर दुकाने लावून चढया भावाने जीवनावश्यक वस्तू भाववाढ करुन ग्राहकांची,जनसामान्याची लुट केली.एकी-कडे बाजार बंद करुन स्वा:ताहाची दुकाने थाटून बाहेरील गोर-गरीब भाजीपाला विक्रीत्यांना पळवून लावत स्व:ताहाची पोळी भाजून मजा मारणाऱ्यावर कार्यवाही करणे आपेक्षित आसल्याचे ग्राहाका दबक्या आवाज सागंत होते.यावेळी गर्दी कमी झाल्याने
वाळकेश्वरवासियांनी पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले.
