कोरोना विषयी आपत्ती निवारण आरोग्य समिती परतूर व आर एस एसच्या वतीने शहरात जनजागृती

Beed

कोरोना विषयी आपत्ती निवारण आरोग्य समिती परतूर व आर एस एसच्या  वतीने शहरात  जनजागृती 

परतूर प्रतिनिधी /संजय खानपटे 
 
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,कोरोना आपत्ती निवारण आरोग्य समिती,परतूरच्या वतीने शहरातील विविध नागरी वस्तीत जाऊन नागरिकांची जनजागृती करण्यात येत आहे.या जनजागृती कार्यक्रमात परतूर येथील विविध भागात प्रत्यक्ष जाऊन डॉ.स्वप्नील मंत्री,डॉ.प्रमोद आकात, डॉ.सुधीर आंबेकर,डॉ.संदीप चव्हाण,डॉ.संजय पुरी,डॉ.भानूदास कदम,डॉ.कल्याण बोनगे,डॉ.हरिप्रसाद ढेरे हे मास्क वापरणे,
वारंवार हात धूणे,
लक्षणे आढळल्यास आरोग्य यंत्रणेसोबत संपर्क साधणे,
मानसिक स्वास्थ चांगले ठेवणे व त्यासाठी करावयाचे उपाय,योगासने, प्राणायाम व आयुष मंत्रालयाच्या प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवावी याविषयावरील तत्वांची माहिती देणे,
आरोग्य सेतू ऐपचे महत्व पटवून सांगणे व रूग्णांचा बहिष्कार न करणे याविषयी नागरिकांचे प्रबोधन करीत आहेत.ह्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असून लोकांमध्ये जनजागृती होऊन त्यांची कोरोना आजाराबद्दलची भिती दूर होत आहे.यावेळी नगरसेवक राजेश भूजबळ, आणि वस्तीतील नागरिक सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.स्व.संघ जिल्हा संपर्क प्रमुख अशोक कादे,तालुका संघचालक शिवाजी पवार, तालुका कार्यवाह योगेश दहिवाळ,शहर कार्यवाह विकास पवार,मनिष अग्रवाल,विजय राऊत,ज्ञानेश्वर भोसले,बालाप्रसाद जेथलिया,शुभम सातोनकर यांच्यासह अनेक स्वयंसेवक अथक परिश्रम घेत आहेत.

Sharing

Visitor Counter