३०जुन पर्यंत लाॅकडाउन परंतु या ठीकाणी लाॅकडाउन नसेल!
Beed

३०जुन पर्यंत लाॅकडाउन परंतु या ठीकाणी लाॅकडाउन नसेल!
नवीदिल्ली
केंद्र सरकारने लाॅकडाउन संदर्भात मोठी घोषणा केली असुन या संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.या घोषणात केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत.
लॉकडाउन आता फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील. ८ जूनपासून आणखी काही बाबी शिथिल करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स ८ जूनपासून उघडणार आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य असणार आहे तसंच मास्क घालणंही अनिवार्य असणार आहे. असंही केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ३० जून पर्यंत फक्त कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहिल अशी घोषणा करण्यात आली आहे.
