12 जुन जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिनानिमित्त बीड शहरात सरकारी कामगार अधिकारी कार्यालय येथे रॅली व जनजागृती कार्यक्रम

12 जुन जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिनानिमित्त बीड शहरात सरकारी कामगार अधिकारी कार्यालय येथे रॅली व जनजागृती कार्यक्रम
श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज आणि ऑक्सफैम इंडिया यांच्या वतीने रॅली व जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
बीड/प्रतिनिधी
सरकारी कामगार अधिकारी कार्यालय बीड व श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला पो देवगाव ता केज आणि ऑक्सफैम इंडिया व महाराष्ट्र लोकविकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने 12 जून 2022 रोजी जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिनानिमित्त सकाळी 09:30 वाजता जिल्हा परिषद कन्या शाळा येथुन भव्य रॅली व जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन रॅलीला हिरवी झेंडी दाखवून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सिध्दार्थ गोडबोले साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले .
हि रॅली जिल्हा परिषद कन्या शाळा - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - नगर रोड मार्गे - जिल्हाधिकारी कार्यालय व पुढे सामाजिक न्यायभवनाच्या प्रांगणात पोहोचली. रॅली मध्ये बालकांच्या हक्का संदर्भातील घोषणाबाजी व बालकामगार प्रथा विरोधी संदेश देण्यात आले.
या रॅलीत बीड जिल्ह्यातील बालहक्क क्षेत्रातील व शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
१२ जुन जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिनाच्या पुर्व संध्येला मा.जिल्हाधिकारी बीड यांनी जिल्ह्यातील आस्थापना मालकांनी १८ वर्षा खालील बालकांना कामावर न ठेवता त्यांना शाळेत पाठवावे असे आवाहन केले आहे.
रॅलीचे उद्घाटन मा.सिध्दार्थ गोडबोले साहेब सदस्य-सचिव ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड, मा.एस. जी.मुंडे सरकारी कामगार अधिकारी बीड, कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य चे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे, मा ओमप्रकाश गिरी, शेखर कानडे, मा.अशोक तांगडे (अध्यक्ष) बाल कल्याण समिती, मा दत्ता नलावडे, अतुल कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे, रामहरी जाधव , विवेकानंद गिरी, गोवर्धन दराडे, यांच्या शुभहस्ते रॕलीला हिरवा झेंडा दाखवून झाले. रॅली मध्ये बालकांच्या हक्का संदर्भातील घोषणाबाजी झाली अशारीतीने आनंदी वातावरणात जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
सदर रॅलीमध्ये चाईल्ड लाईन , श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज जि बीड, महाराष्ट्र लोकविकास मंच आनंदग्राम सामाजिक संस्था पाली ,पसायदान सेवा प्रकल्प,बाल कल्याण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते .रॅलीच्या समारोप प्रसंगी ऊसतोड कामगारांची मुले बालमजुरी होऊ नयेत यासंदर्भात बाल हक्क अबाधित राहावेत या अनुषंगाने मागणीचे निवेदन मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कडे ऑक्सफैम इंडिया व श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज तसेच जिल्ह्यातील सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक संस्था कार्यकर्ते, बालहक्क कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता असे महाराष्ट्र लोकविकास मंचचे जिल्हा प्रतिनीधी ओमप्रकाश गिरी व बाजीराव ढाकणे यांनी सांगितले.
