बालकामगार आढळल्यास तात्काळ नजीकच्या कामगार कार्यालयास

Beed

बालकामगार आढळल्यास तात्काळ नजीकच्या कामगार कार्यालयास

अथवा हेल्पलाईन क्र. १०९८ वर कळवावे – कामगार आयुक्त सुरेश जाधव

बीड/वार्ताहर 

१४ वर्षाखालील लहान मुले शाळेत न जाता कुठे काम करतांना दिसली तर आपण तात्काळ नजीकच्या कामगार कार्यालयास अथवा हेल्पलाईन क्र. १०९८ वर कळवावे. आपले नाव गुप्त राखले जाईल, असे आवाहन राज्याचे कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय बाल मजुरी विरोधी दिनाचे औचित्य साधून त्यांनी हे आवाहन केले आहे.

कामगार आयुक्त सुरेश जाधव म्हणाले, बालमजुरी ही एक विघातक सामाजिक अनिष्ट प्रथा आहे. तिचे निर्मूलन करण्याकरिता आपण सर्व एक होऊया व महाराष्ट्रातून बालमजुरी नष्ट करूया. सर्व १४ वर्षाखालील मुलांना घटनेने शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिला आहे. याकरिता महाराष्ट्र राज्यात १४ वर्षाखालील गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. सर्व लहान मुलांनी शाळेत शिकून स्वतःचे व त्यायोगे देशाचे भविष्य उज्ज्वल करावे, ही त्यामागची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु काही समाजकंटक या कोवळ्या जीवांना स्वार्थ जोपासण्याकरिता कामावर ठेवतात. यास आपण एकत्रपणे विरोध करावा. आपण अशा समाजकंटकांची माहिती आम्हाला कळवावी. आम्ही त्वरेने अशा समाजकंटकाविरुध्द खात्रीशीर कारवाई करू व त्या ग्रस्त मुलाला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्याला भारताचा सुजाण नागरिक बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Sharing

Visitor Counter