अवैध वाळू वाहतूक करणा-यांवर तहसिलदार निलीमा थेऊरकर यांनी केली कारवाई

अवैध वाळू वाहतूक करणा-यांवर तहसिलदार निलीमा थेऊरकर यांनी केली कारवाई
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
तालुक्यातील सांगवी आष्टी येथे अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खबर तहसिलदार निलीमा थेऊरकर यांना मिळताच त्यांनी थेट सांगवी येथे जाऊन अवैध वाळू वाहतूक करणा-या ट्रक्टर ताब्यात घेत 1 लाख 27 हजार 46 रुपये दंड ठोठावल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत तहसिल प्रशासनाकडून मिळालेली अधिक माहिती अशी तालुक्यातील सांगवी आष्टी येथे आज शनिवार दि.30 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती तहसिलदार निलीमा थेऊरकर यांना खब-या मार्फत मिळताच त्यांनी मंडळअधिकारी शिवप्रसाद सिंघनवाड,तलाठी व कार्यालयातील कर्मचा-यांसह थेट सांगवी गाठली.परंतु वाळू माफियांना तहसिलदार कारवाईसाठी येत असल्याची माहिती होताच त्यांनी वाळूने भरलेली ट्रली तेथेच सोडून देत ट्रक्टर घेऊन पळ काढला.याठिकाणी उभा असलेल्या ट्रलीमध्ये एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून,अश्राजी देवराव खेडकर यांना सव्वा लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
