प्रभाग एकमधील सुरक्षा समितीकडून होम कोरोंटाईन कुटूंबाना किराणा वाटप

Dharur

प्रभाग एकमधील सुरक्षा समितीकडून होम कोरोंटाईन कुटूंबाना किराणा वाटप

किल्लेधारूर/इरफान शेख  

प्रभाग एकमधील सुरक्षा समितीकडून होम कोरोंटाईन असलेल्या अकरा कुटूंबांना मोफत किराणा सामानाचे घरपोच वाटप करण्यात आले.

शहरातील आठ प्रभागात नगर परिषदेच्या वतीने सुरक्षा समित्या गठित करण्यात आल्या आहेत. सर्वच प्रभागातील सुरक्षा समित्या सक्रीय कार्यरत आहेत. येथील प्रभाग एक मधील सुरक्षा समितीच्या वतीने आज दि.३१ रोजी प्रभागात होम कोरोंटाईन असलेल्या अकरा कुटूंबांना मोफत किराणा सामानाचे घरपोच वितरण करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष बालाजी चव्हाण, पत्रकार अनिल महाजन, अतुल शिनगारे उपस्थित होते. दरम्यान प्रभाग सहा मध्ये आढळून आलेल्या कोरोना बाधिताच्या कुटूंबियांनाही आज संतोष सिरसट यांच्या वतीने किराणा सामान देण्यात आले.

Sharing

Visitor Counter