कृषि विभागातर्फे 25 जूनपासून कृषि संजीवनी मोहीम

Beed

कृषि विभागातर्फे 25 जूनपासून कृषि संजीवनी मोहीम

बीड/वार्ताहर 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दि. 25 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत कृषि विभागाकडून कृषि संजीवनी मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषि दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. या पार्श्वभूमिवर मोहीम कालावधीत खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील कृषि विभागाचे अधिकारी/ कर्मचारी, जिल्हा परिषद, कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे यांचे शास्त्रज्ञ, कृषि मित्र हे शेतकऱ्यांना बांधावर जावून मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी ही माहिती दिली.

मोहिमेंतर्गत कार्यक्रम पुढीलप्रमाणे : 25 जून विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार मूल्य साखळी बळकटीकरण दिन, 26 जून पौष्टिक तृणधान्य, 27 जून महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस, 28 जून खत बचत दिन, 29 जून प्रगतशील शेतकरी संवाद दिन, 30 जून शेती पूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस व 1 जुलै कृषि दिन या कार्यक्रमाने या मोहिमेची सांगता होणार आहे.

Sharing

Visitor Counter