निंबोळी पासून निघणारे तेलात देखील उत्तम कीट नाशक गुणधर्म

निंबोळी पासून निघणारे तेलात देखील उत्तम कीट नाशक गुणधर्म
बीड/वार्ताहर
आधुनिक शास्त्रात लिंबाचे विविध भागांचे रासायनिक विश्लेषण केले असता त्यात नानाविध उपयुक्त संयुगे आढळून आलेली आहेत. त्यात विविध अल्कोलॉडसचा समावेश आहे. ही विविध संयुगे पिक संरक्षणासाठी कीड नियंत्रण, रोग नियंत्रण करता येऊ शकतो. पिक वाढीचे सुरुवातीचे काळात कीड रोगास प्रतिबंधक म्हणून उपयुक्त ठरतो. निंबोळी पासून निघणारे तेलात देखील उत्तम कीट नाशक गुणधर्म असतात. तेल काढून झाल्यानंतर उरलेली निंबोळी पॅड हे उत्तम दर्जाचे सेंद्रीय खत आहे. निंबोळी खतामुळे रासायनिक खताचे वापरात बचत होते. खतांची उपयुक्तता वाढते. लिंब वृक्षाचे महत्तव अगदी प्राचीन ग्रंथामध्ये विषद केलेले आहे. अशा सर्व गुणसंपन्न निंबोळ्यांचा वापर शेती उत्पादनात करण्याची गरज आहे. विशेषत: खर्च बचत व पर्यावरण रक्षण यासाठी निंबोळी वापर अत्यावश्यक आहे. सध्या निंबोळीचा हंगाम सुरु झालेला आहे. तरी शेतकरी बांधवांनी भविष्यकालीन वापरासाठी या काळात निंबोळ्या गोळा कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड यांनी केले आहे.
