श्री संत मुक्ताईंच्या पालखीचे वाजत-गाजत बीड शहरातून पंढरपुरकडे प्रस्थान

Beed

श्री संत मुक्ताईंच्या पालखीचे वाजत-गाजत बीड शहरातून पंढरपुरकडे प्रस्थान

प्रशांत डोरले यांच्या वतीने आ.मेटे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना व वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप

बीड/प्रतिनिधी

 श्रीसंत मुक्ताईंची पालखीचे बीड शहरातुन पंढरपुरकड़े प्रस्थान करतेवेळी शिवसंग्राम युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले व संकल्प युवा सामाजिक प्रतिष्ठान,बीड यांच्या वतीने आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी आई मुक्ताई चरणी प्रार्थना करत पालखीत सहभागी झालेल्या सर्वच वारकरी बांधवांना चहा पाणी व अल्पोपहार वाटप करत पालखीचे हर्षोल्लासात मध्यवर्ती बस्थानक समोर स्वागत करन्यात आले.

हा पालखी सोहळा शहरातील मालीवेस चौक, सुभाष रोड, बस्थानकमार्गे वारकरी दिंड्या, पताका, ध्वजकरी, विठूरायाचे नामस्मरण करीत पाली येथील मंदिरात मुक्कामी जातात. यावेळी वारकऱ्यांना संकल्प युवा सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने फराळाचे वाटप करण्याची परंपरा गेल्या ६ वर्षी पासुन अवितरपणे चालू आहे. गत कोरोना काळात पडलेला खंड यामुळे सर्वच जण मुक्ताई दर्शनासाठी आसुसलेले होते, यातच यावर्षी भव्य अशी पालखी सोहळा पार पाडत असताना श्रीसंत मुक्ताईंच्या पादुकांची महाआरती प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत डोरले, तिलक झाडीवाले यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पालखी सोहळ्याचे संस्थानप्रमुख अॅड. रविंद्र पाटील, दिंडीचे प्रमुख हरणे महाराज पाटील, श्री.श्री.अमृतक्ष्रम महाराज यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून आदरयुक्त सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला फराळ म्हणून केळी, खिचडी भात, राजगीरा लाडू असे विविध फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री. लक्ष्मण डोरले, राजेंद्र झाडीवाले, राहुल ठाकुर, अनिल पाटील, मयुर डोरले, दादाराव चौहान, गणेश चौरे, कृष्णा नागरगोजे, किशोर मामा जायभाये, ऋषिकेश कुटे, कृष्णा तिडके, प्रवीण तिडके, गणेश काळे, शिवसंग्रामचे गोपीनाथ देशपांडे, अमर डोरले, मयुर डोरले या व्यतिरिक्त बस्थानक परिसरातील सर्व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

 

मुक्ताई चरणी युवकांची व्यसनमुक्तीचा आन

गत ५ वर्षांपासून बीड शहरातून पंढरपूर कडे प्रस्थान करणाऱ्या श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यास फराळ वाटप करण्यात येतो सोबतच एक नवीन संकल्पना अमलात आणून तिचे पालन गेल्या पाच वर्षांपासून नियमित केले जाते, याच निमित्ताने दि. २६ जुन रोजी मार्गस्थ झालेल्या पालखी सोहळ्यात मुक्ताई चरनाची आन घेत व श्री. अमृताक्षम महाराज, श्री पाटील साहेब, श्री. हरणे महाराज यांच्या आशीर्वादाने १० युवकांनी व्यसन कायमचे बंद करण्याचा संकल्प केला आहे, या उपक्रमाबाबत मान्यवरांकडून प्रतिष्ठानचे कौतुक करण्यात आले आहे.

Sharing

Visitor Counter