चिमुकल्यांचा पोषण आहार काळ्या बाजारात;जिल्हा अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज 

Beed

चिमुकल्यांचा पोषण आहार काळ्या बाजारात;जिल्हा अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज 

बीड/प्रतिनिधी 

काय झालं आहे ह्या शहराला कुणी मजुरांची भाकरी चोरतो तर कुणी लहान मुलांचा शिधा हडप करताय झालं काय आहे ह्या लोकांना का गरीब आणि निष्पाप लहानग्यांच्या अन्नावर ह्यांचा डोळा आहे.बीड शहरासह तालूक्यात सध्या अंगणवाड्यांना पुरवण्यात येणाऱ्या पोषक आहार नेमका काळ्या बाजारात नेणारे कोण ? असा प्रश्न चर्चेला जात आहे.भ्रष्टाचाराचे तर अनेक मार्ग असताना सुध्दा काही लबाड लोक हे अंगणवाड्यात शिकणाऱ्या त्या गरीब चिमुकल्यांच्या तोंडातला घास पळवत आहेत . गोरगरीबांना मिळणारे पोषक आहाराचे पाकिटे पळवून हे पाप कुठे फेडणार असा सवाल नागरिक करत आहेत . बीड शहरातील एक अंगणवाड्यांना पोषक आहार पुरवणारा ठेकेदार अंगणवाड्यातील चिमुकल्यांच्या तोंडातला घास चोरुन काळ्या बाजारात त्याची विक्री करत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे . या बाबत उघडपणे कुणीही पुढे येवून तक्रार करत नसल्याचे कारण म्हणजे ज्यांनी सदरील कांड पाहिले आहे त्या गोरगरीबांना धमक्या सुध्दा देण्याचे काम काही लोक करत आहेत . मात्र हे करत असताना आपण चिमुकल्यांच्या तोंडातला घास चोरत असल्याचे पाप करत आहोत हे सुध्दा त्यांच्या ध्यानी नाही . परंतु लवकरच अशा खाऊजींचे भांडाफोड होणार हे नक्की .

Sharing

Visitor Counter