खडकत येथील अवैद्य कत्तलखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यवाहीचा दनका

खडकत येथील अवैद्य कत्तलखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यवाहीचा दनका
बीड/वार्ताहर
आष्टी तालुक्यातील खडकत गावामध्ये मुजाहीद जब्बार पठाण व इतर असे अवैध रित्या गोवंशीय प्राण्याची कत्तल करत असल्याची बातमी गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा , बीड यांना मिळालेवरुन त्यांनी त्यांचे आधिपत्याखालील 03 वेगवेगळी पथके तयार करुन सदर बातमी मिळाले ठिकाणी खडकत ता . आष्टी येथे गोवंशीय कत्तलखाण्यावर छापा मारुन कार्यवाही करणे कामी पाठविले असता . सदरील पथकांनी दिनांक 07/07/2022 रोजी 00.30 वाजता खडकत गावात पंचाना सोबत घेवून पत्र्याचे शेडमध्ये छापा मारला असता . पत्र्याचे शेंडमध्ये तिन इसम पळुन जात असताना त्यापैकी दोन इसम मिळुन आले 1 ) मुजाहीद जब्बार पठाण वय 45 वर्ष , 2 ) अतीक मुन्नीर कुरेशी वय 30 वर्ष दोन्ही रा . खडकत ता . आष्टी असे सांगुन पळुन गेलेल्या इसमाचे नाव सदाम अजीज कुरेशी रा . खडकत असे सांगितले . सदर ठिकाणी गोवंशीय प्राण्याचे मांस , बाजुचे गोडावुन मध्ये गोवंशीय प्राण्याची कातडी तसेच त्यालगत असले मोकळया कंपाउंड मध्ये कत्तल करण्यासाठी आणलेले एकुण 21 गायी , 05 वासरे असे मिळुन आले . सदरचा कत्तलखाना हा मुजाहिद्द जब्बार पठाण याचा असुन मिळालेले गोवंशीय मांसाची सी . ए . सॅम्पल घेणे कामी डॉ . संदिप गायकवाड , पशु धन विकास अधिकारी , आष्टी यांना बोलावुन घेवून त्यांनी मांसाचे सॅम्पल घेतले . सदर छाप्याच्या ठिकाणी 02 क्विटल गोवंशीय प्राण्याचे मांस , 210 गोवंशीय प्राण्याची कातडी , 21 गायी , 05 वासरे असा एकुण 7,37,000 रुपायाचा मुद्येमाल मिळुन आल्याने 03 आरोपींताच्या विरुध्द पोलीस स्टेशन आष्टी येथे गुरनं .215 / 2022 कलम 429,34 भादवि सह कलम 5 ( b ) , 5 ( c ) , 9 ( a ) महाराष्ट्र गोहत्या बंदी कायदया प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री . नंदकुमार ठाकुर , अपर पोलीस अधीक्षक श्री . सुनिल लांजेवार , मा . उप विभागीय पोलीस अधीकारी श्री , अभिजीत धाराशिवकर , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , श्री सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा , बीडचे पथकाने केलेली आहे .
