शहीद भगतसिंग युवा मंच नेकनुर च्या मागनीला आखेर यश

शहीद भगतसिंग युवा मंच नेकनुर च्या मागनीला आखेर यश
26जानेवारी ला केले होते ग्रामपंचायत समोर आंदोलन; बाजारात शौचालय कधी बांधणार?
नेकनुर/वार्ताहर
येथील शहीद भगतसिंग युवा मंच नेकनुर ने 26 जानेवारी 2022 रोजी विविध मागण्यासाठी नेकनूर ग्रामपंचायत समोर आंदोलन केले होते. कालिका मंदिर पासून स्त्री रुग्णालया जोडणारा रस्ता आखेर आज तयार होत आहे गेले कित्येक महिन्यापासून नेकनुर येथील सक्षम सामाजिक संघटन शहीद भगतसिंग युवा मंच नेकनुर ने सदर रस्त्यासाठी योग्य पाठपुरावा केला व आज त्या पाठपुराव्याला यश आले आहे हा नेकनुर हायवे पासुन स्त्री रुग्णालया ला जोडणारा रस्ता अतिशय खराब आणि होता ज्यांने करुन रात्री अपरात्री रुग्णालयात येणाऱ्या गरोदर महिलांना या रस्त्यामुळे होणारा त्रास अती कमी होईल.
ते बाजारातील महिलांच्या शौचालयाचे काय झाले?
स्त्री रुग्णालयासोबत शहीद भगतसिंग युवा मंचने नेकनूर बाजार येथे महिलांसाठी शौचालय बांधण्याची मागणी केली होती. नेकनुर बाजार तळ हे मराठवाड्यातील सर्वात मोठा बाजार आहे. येथे संपूर्ण मराठवाड्यातील खेड्यापाड्यातून लोक खरेदी विक्री करण्यासाठी येतात. ह्यात 40-50% महिला असते. त्यांना शौचालयाची सुविधा नसल्याने कुठेही झाडे व झुडपाचा असरा घेऊन उघड्यातच आपले नैसर्गिक विधी करावी लागते जे एक लज्जास्पद गोष्ट आहे.
