अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अग्निपथ, पोलीस भरती, एमपीएससी, यूपीएससी साठी मोफत मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्या - ॲड. ज़ेबा शेख

अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अग्निपथ, पोलीस भरती, एमपीएससी, यूपीएससी साठी मोफत मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्या - ॲड. ज़ेबा शेख
बीड/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा ॲड. ज़ेबा शेख यांनी अग्निपथ, पोलीस भरती एमपीएससी, यूपीएससी साठी मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. याचा इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बीड विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार विद्यमान आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती शहराध्यक्षा ॲड. ज़ेबा शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने अग्निपथ व पोलीस भरती साठी मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. हे एक दिवसीय शिबिर रविवार, दिनांक २४ जुलै २०२२ रोजी, सकाळी ११ वाजेपासून बार्शी रोडवर स्थित राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये अग्निपथ, पोलीस भरती, एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचा सुशिक्षितांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. असे आवाहन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या बीड शहराध्यक्षा ॲड. ज़ेबा शेख यांनी केले आहे.