प्रभाग क्रमांक १२ मधील मंजूर झालेले रस्ते व नाल्यांच्या कामांची माहिती द्या !

Beed

प्रभाग क्रमांक १२ मधील मंजूर झालेले रस्ते व नाल्यांच्या कामांची माहिती द्या !

सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांची जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी 

बीड/प्रतिनिधी

दिनांक १३ सप्टेंबर २०२१ रोजी बीड नगर परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेत बालेपीर भागातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये असलेल्या रोशनपुरा भागात मंजूर केलेले रस्ते व नाल्यांच्या कामांची प्रत आणि मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिलेल्या कामाची प्रत देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्तेशेख मोहसीन बुऱ्हानुद्दीन यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दिनांक १३ सप्टेंबर २०२१ रोजी बीड नगर परिषदेत घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत बालेपीर भागात असलेल्या प्रभाग क्रमांक १२ मधील रोशनपुरा भागात रस्ते व नाल्यांच्या कामांना मंजुरी मिळाली होती परंतु कालांतराने या मंजुरीस जिल्हाधिकारी साहेबांनी स्थगिती दिली. यामुळे या प्रभागातील आवश्यक असलेले रस्ते व नाल्यांचे काम आजपर्यंत रखडलेले असून सध्या पाऊस पाण्याचे दिवस असल्याने कच्चे रस्ते आणि रस्त्यांवरून वाहणारे सांडपाण्यामुळे प्रभागातील नागरिकांना ये-जा करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक १२ रोशनपुरा प्रभागातील मंजूर रस्ते व नाल्यांच्या कामांची प्रत तसेच स्थगिती देण्यात आलेल्या या प्रभागातील विकास कामांची प्रत देण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन बुऱ्हानुद्दीन यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Sharing

Visitor Counter