मासा लागला गळाला,नगरसेवक कुठे पळाला?- नवीद इनामदार

मासा लागला गळाला,नगरसेवक कुठे पळाला?- नवीद इनामदार
निवेदन धारी मुळे मोमीनपुरा विभागात चिखलमय
बीड/प्रतिनिधी
मोमीन पुरा भागत'कोणी रस्ता देता का रस्ता', ''फक्त मत मागायला येता ओ शेठ, तुम्ही नादच केला थेट'. रस्त्याची अवस्था अंत्यंत खराब झाल्याने त्रस्त नागरिकांनी व्यथेची याद्वारे वाचा फोडली आहे. मात्र गेल्या पाच वर्षापासून नगरसेवकांनी फक्त निवेदनावर निवेदन दिले व भुयारी गटार व मुरूम टाकून व विकास समजून चिखलमय केले
त्यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यासाठी खूप मोठी करावी लागते कसरत शहरातील प्रभाग क्रमांक २१ मधील मोमीन पुरा भागातील रस्त्याची दुरावस्था झाल्यानेदात कोणाकडे मागायची हाच प्रश्न मोठा निर्माण झाला आहे .बीड शहरातील प्रभाग क्रमांक २१ मधील मोमीन पुर्याचे नागरिक रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हैराण झाले आहेत.नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी गांधीगिरी करीत बेशरम चे झाड सुद्धा लावण्यात आले मात्र आजी माजी भावी नगरसेवकांना कसलेही लज्जा नसल्यामुळे स्थानिक नागरिकांचे हाल होत आहे .या भागामध्ये पाणी साठून राहून डासांचा मोठा उपद्रव झाला आहे. परिणामी नागरिक तापाने फणफणले असून, अनेकांना डेंग्यू, मलेरियाची लागण झाली आहे. त्यामुळेे परिसराची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे मात्र मासा लागला गळाला, नगरसेवक कुठे पळाला ?असे समाजसेवक नवीद इनामदार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे
