जीसीसी-टीबीसी कॉम्प्युटर कोर्सचा लाभ घ्या - प्राचार्य अतुल कुमार

Beed

जीसीसी-टीबीसी कॉम्प्युटर कोर्सचा लाभ घ्या - प्राचार्य अतुल कुमार 

बीड/प्रतिनिधी

माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या किंवा घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता शासकीय-प्रशासकीय तसेच खाजगी क्षेत्रात उपयुक्त व अनिवार्य असलेले जीसीसी व टीबीसी कॉम्प्युटर कोर्ससाठी प्रवेश सुरू झालेले आहे याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य अतुल कुमार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, आज-काल स्पर्धेच्या युगात फक्त शिक्षण व उच्च शिक्षण घेऊन चालत नाही. शिक्षणासोबतच इतर कौशल्येही प्रत्येक शिक्षण घेणाऱ्याला यायला हव्यात. यामध्ये सध्याच्या काळात शिक्षणासह जर अत्यंत महत्त्वाचे असे स्थान कशाला असेल तर ते कॉम्प्युटरला आहे. कॉम्प्युटर आज दैनंदिन जीवनात एक अविभाज्य घटक बनले आहे. कॉम्प्युटर मध्ये हार्डवेअर व सॉफ्टवेअर चे तिमाही, सहामाही, वार्षिक द्विवार्षिक इ. असे सोयीचे वेगवेगळे कोर्स शासनाकडून निर्माण करून देण्यात आलेले आहेत. त्यात प्रवेश घेऊन पारंगत झालेल्यांना नोकरी मग ती सरकारी असो की खाजगी, व्यापार उदिम असो की वैयक्तिक उपयोग असो, कॉम्प्युटरचे शिक्षण कुठेही आणि कधीही उपयोगी पडते. या अनुषंगाने बीड शहरातील धानोरा रोडवर असलेल्या युगसाक्षी कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये कॉम्प्युटर चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जीसीसी-टीबीसी हा शासनमान्य कोर्स मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेत उपलब्ध आहे. हा कोर्स शासनमान्य असून हा कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर शासकीय-निमशासकीय कार्यालयांसह खाजगी क्षेत्रातील उद्योगांमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर आणि कलार्क च्या पदासाठी पात्र ठरणारा आहे. तसेच एमपीएससीसाठी ही उपयोगाचे आहे. यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन युगसाक्षी कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, धानोरा रोड, बीड चे संस्थापक संचालक तथा प्राचार्य अतुलकुमार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

 

Sharing

Visitor Counter