मुरूम चे राजकारण किती दिवस?मंजुर झालेल्या रोडवर पुन्हा मुरूमचा लाॅलीपाॅप

मुरूम चे राजकारण किती दिवस?मंजुर झालेल्या रोडवर पुन्हा मुरूमचा लाॅलीपाॅप
बीड/वार्ताहर
बीड शहरातील काकु नाना आडत मार्केट समोरील रोडची आवस्था खुप बिकट झाली असुनही याकडे कोणाचाच लक्ष नसल्यागत पाहण्यास मिळत आहे.या रोडचे किती तरी वेळेस उद्घाटन ही झाले मात्र कामाला सुरूवात काय झाली नाही कामाला सुरूवात कधी होणार? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. उद्घाटन करून किती दिवस झालेत स्थानिक नागरिकांना कामाला सुरूवात होईल म्हणून आशा लागली होती पण यांना काय माहीत की पुन्हा यांच्या नशीबी मुरूमच आहे म्हणून पुन्हा या रोडवर मुरूम टाकून राजकारण केल्याचे चित्र पाहाण्यास मिळत आहेत .
बीड शहरातील आगामी निवडणूक लक्षात घेत आतापर्यंत झोपलेल्या नगरपरिषदेला जाग आली आहे म्हणूनच बीड शहरातील अनेक भागात (पेवन लावण्याचे)म्हणजेच मुरूम टाकण्याचे काम चालू झाले आहेत. वार्डाचा विकास करताना त्याच्याच सर्वांगीण विकासाची गरज असते आणि त्यात प्रामुख्याने लाईट, पाणी,रस्ते आणी नाल्या व वॉर्डातील लोकांचे आरोग्य हे महत्वाचे असताना . रस्त्यात फक्त मुरूम टाकून लोकांची दिशाभुल करून जर सत्येच राजकारण करायचे असेल तर जनतेने जागृत होन गरजेचे आहे कारण . हे तात्पुरती डागडुजी उपयोगाची नाही ना? यामुळे लोकांच्या जिवित्वा ची कोणी हमी नाही देऊ शकत. त्यामुळे जर खरंच लोकसेवा करायचीच असेल तर ती तात्पुरती डागडुजी न करता कायम स्वरूपाची करावी तरच लोकांनाही आपल्याविषयी आदर वाटेल. त्यामुळे रोड वर मुरूम टाकून लोकांची दिशाभुल करू नका मंजुर झालेल्या रोडच्या कामाला तात्कळ सुरूवात करा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
