उद्या बीडमध्ये एमएसएमईवर कार्यशाळा

Beed

उद्या बीडमध्ये एमएसएमईवर कार्यशाळा

रोटरी क्लब, जैन संघटना, व्यापारी महासंघाचा पुढाकार

बीड/प्रतिनिधी

एमएसएमई चे फायदे आणि नियमांविषयी कार्यशाळेचे आयोजन उद्या दि.6 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या विषयातील तज्ञ श्री निरंजनजी जुवा (जैन) हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.रोटरी क्लब ऑफ बीड, भारतीय जैन संघटना व व्यापारी महासंघाच्या वतीने हॉटेल अन्वितामध्ये रात्री 8 वाजता होणार्‍या या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवउद्योजक, व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्याची परिपूर्ण माहिती असल्यास त्याचा योग्यरित्या लाभ घेवून व्यवसायवृद्धी साधली जाऊ शकते. केंद्र सरकारच्या एमएसएमई हा उपक्रम नेमका काय आहे, त्यामध्ये कोणत्या तरतूदी आहेत, कर्ज योजना कोणत्या, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कोणता लाभ मिळू शकतो, एमएसएई पॉलिसी अंतर्गत रजिस्ट्रेशन कसे करावे, ते का आवश्यक आहे, गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस काय आहे, या माध्यमातून शासनाच्या विविध विभागात विक्रीबाबतच्या माहितीसह इतर महत्त्वपूर्ण विषयावर निरंजनजी जुवा मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, सचिव सुनिल जोशी, प्रोजेक्ट चेअरमन सुरज लाहोटी, प्रमोद निनाळ, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी, विनोद पिंगळे, भास्कर गायकवाड, सुर्यकांत महाजन, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष जैन, सचिव अमित पगारिया, सी.ए. आदेश नहार, सुहास मुनोत यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter