स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गुरूवारी बीड तहसील कार्यालय सभागृहात कार्यक्रम

Beed

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गुरूवारी बीड तहसील कार्यालय सभागृहात कार्यक्रम

तहसील कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व महिला कला महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम

बीड/वार्ताहर 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गुरूवार, दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बीड तहसील कार्यालय सभागृहात कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तहसील कार्यालय, बीड, जिल्हा माहिती कार्यालय, बीड व महिला कला महाविद्यालय, बीडच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

        या कार्यक्रमात तहसीलदार सुहास हजारे यांची प्रमुख उपस्थिती असून, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील महिलांचे योगदान या विषयावर महिला कला महाविद्यालय, बीडच्या प्राचार्या डॉ. सविता शेटे यांचे व्याख्यान होणार आहे. तर लोकशाही बळकटीकरण व माहितीचा अधिकार या विषयावर यशदा, पुणेचे प्रशिक्षक किरण ननवरे मार्गदर्शन करणार आहेत.

 

            स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हाभरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Sharing

Visitor Counter