स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कार्यवाही ;नेकनूर हद्दील वडवाडी येथे दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कार्यवाही ;नेकनूर हद्दील वडवाडी येथे दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
बीड/वार्ताहर
दिनांक 04/08/2022 रोजी पहाटे 0130 ते 0245 वा . सु . बळीराजा विज्ञान केंद्रात वडवाडी ता.जि.बीड येथे अज्ञात आठ चोरटयांनी फिर्यादी अभिमान शाहराव अवचार वय 39 व्य . कृषीसंस्था व शेती रा.वडवाडी व त्यांची पत्नी सत्वशिला हे त्यांचे राहते घरी तिसऱ्या मजल्यावर बेडरुममध्ये झोपले असतांना मध्यरात्री अचानक चोरटयांनी फिर्यादीचे घरात प्रवेश करून फिर्यादीस व त्याची पत्नीस मारहाण करून जखमी केले व त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिने व ऑफिस मधील रोख असा एकुण 10,60,000 / - रु चा मुद्देमाल शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून लटून नेला आहे . वगैरे फिर्याद वरून दिनांक 04/08/2022 रोजी 1835 वा . पो.स्टे . नेकनूर येथे गुरनं 180/2022 कलम 395,397 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता . बीड यांनी सदर गुन्हयाचे घटनेच्या अनुषंगाने मा . पोलीस अधीक्षक , बीड यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा , समांतर तपास चालु केला होता . समांतर तपास चालु असतांना बीड व उस्मानाबाद जिल्हयाच्या सरहद्दीतील गुन्हेगार वस्त्या चेक केल्या तसेच नमुद गुन्हेगार वस्त्यांवर गुप्त बातमीदार नेमण , बातमीदारांकडुन वेगवेगळे प्रकारे माहिती घेण्यात येत असतांना नेमलेल्या गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की , फिर्यादी नामे अभिमान शाहुराव अवचार यांच्या कृषी सेवा केंद्रामध्ये काही वर्षापूर्वी एक इसम काम सोडुन दुसरीकडे कामास गेला होता , परंतु तेथील आर्थीक व्यवहारा बद्दल त्याला बरीचशी माहिती होती . सदर आर्थीक व्यवहारा बद्दल त्याचे मनात लुटमार करून दरोडा घालुन सदर ठिकाणची रक्कम लुटण्याचा विचार करून इतर साथीदारांसह सदर दरोडा घालण्यासाठी आरोपी नामे 1 ) दत्ता रमेश शिंदे वय 27 वर्षे , 2 ) आकाश बापु काळे वय 22 वर्षे दोन्ही रा.कोठाळवाडी , महादेवनगर , ता . कळंब जि . उस्मानाबाद यांनी व त्याचे इतर साथीदार या सर्वांनी मिळून वडवाडी ता.जि.बीड येथील बळीराजा विज्ञान केंद्र येथे दिनांक 04/08/2022 रोजी 0130 ते 02.45 वा . दरम्यान सर्वांनी मिळुन सशस्त्र दरोडा घातला व फिर्यादी व त्याचे पत्नीस जबर मारहाण करून त्यांचे हातपाय बांधून त्यांचे जवळील सोन्याचे दागिने व ऑफिस मधील रोख रक्कम बळजबरीने लुटून नेली . वरील मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व आरोपीचे वर्णनावरून स्था.गु.शा.चे पथक व स्था.गु.शा. उस्मानाबाद यांनी संयुक्त पथकाने दिनांक 11/08/2022 रोजी मध्यरात्री टोकणी पेढी या ठिकाणी कोम्बींग ऑपरेशन राबवून काही संशयीत इसम ताब्यात घेण्यात आले होते . ताब्यात घेतलेल्या संशयीत इसमांचे अभिलेख पडताळणी केली असता पो.स्टे . बीड ग्रामीण गुरनं 318/2019 कलम 397,395,323,506 भादंवि सह सह 4/25 भारती हत्यार कायदा मधील निष्पन्न आरोपी 1 ) बलभिम बाबु काळे वय 32. 2 ) अनिल ऊर्फ राहुल अंकुश शिंदे वय 25 दोन्ही रा.कोठाळवाडी , महादेवनगर ता . कळंब जि . उस्मानाबाद हे पाहिजे रेकॉर्ड वरील आरोपी असल्याने त्यांना बीड ग्रामीण पो.स्टे . येथे हजर करण्यात आले . तसेच आरोपी नामे 1 ) दत्ता रमेश शिंदे वय 27 वर्षे , 2 ) आकाश बापु काळे वय 22 वर्षे दोन्ही रा . कोठाळवाडी , महादेवनगर , ता . कळंब जि . उस्मानाबाद यांना ताब्यात घेवून पो स्टे नेकनूर गुरनं 180/2022 कलम 395,397 भादंविचे तपासकामी हजर केले असून पुढील तपास पो स्टे नेकनूर व स्था गु . शा . चे पथक करीत आहे . सदर आरोपीकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . वरील गुन्हयातील चोरलेल्या मुद्देमाला बाबत व त्यांनी केलेल्या आणखीन गुन्हयाबाबत कसून तपास चालू आहे . सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा , बीड येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .
