महाराज राठोड यांच्या खांद्यावर दत्ता राठोड, राजू जाधव, रमेश राठोड, किल्लर जाधव यांचीही जिल्हा कार्यकारिणीत झाली निवड

महाराज राठोड यांच्या खांद्यावर दत्ता राठोड, राजू जाधव, रमेश राठोड, किल्लर जाधव यांचीही जिल्हा कार्यकारिणीत झाली निवड
बीड/वार्ताहर
आगामी निवडणूका व संघटना सक्षम करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष भगवंतसेवक किसनभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव प्रा.पी.टी.चव्हाण सर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बैठक आयोजित करून नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदाची धुरा बाजीराव महाराज राठोड यांच्या खांद्यावर देण्यात आली आली.
त्याचबरोबर गेवराई तालुका युवा आघाडी प्रमुखपदी दत्ता जाधव, गेवराई तालुका सचिव पदी रमेश राठोड, सोशल मीडिया प्रमुख पदी राजू जाधव तर नाळवंडी सर्कल प्रमुखपदी किल्लर जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना प्रा. पी.टी. चव्हाण सर यांनी सांगितले की, जिल्ह्यात आजी माजी कार्यकर्त्यानी एकजुटीने काम करत संघटन वाढवून आपली ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. तरी सर्वांनी मन भेद व मत भेद दूर करून जोमाने काम केले पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच अनेकांनी आप आपली मते व्यक्त केली. यावेळी बैठकीला बीड तालुका अध्यक्ष बाळराजे राठोड, जिल्हा संघटक अमर राठोड, मैत्री फाउंडेशन जिल्हा अध्यक्ष संजय राठोड,नाळवंडी सरपंच ज्ञानेश्वर राठोड, सुरेश पवार, कृष्णा राठोड, संदीप जाधव, नामदेव राठोड, गुलाब जाधव, कैलास पवार, राजू पवार, संतोष राठोड, पवन जाधव, रमेश राठोड, एकनाथ आडे, दत्ता राठोड, प्रदीप आडे, मनोज जाधव, राजू जाधव, सतीश जाधव, गणेश राठोड, संकेत जाधव, नितीन राठोड, पप्पू आडे, शिवाजी पवार, नाथा पवार, गोरख राठोड आदी उपस्थित होते.
