बीड जिल्हाप्रशासनाची वृक्षलागवड नुसताच "इव्हेंट " वनविभाग,रोहयो अंतर्गत वृक्षलागवड गैरव्यवहार प्रकरणात कारवाई शुन्य; दिमाग की बत्ती जलाओ आंदोलन-डाॅ.गणेश ढवळे

बीड जिल्हाप्रशासनाची वृक्षलागवड नुसताच "इव्हेंट " वनविभाग,रोहयो अंतर्गत वृक्षलागवड गैरव्यवहार प्रकरणात कारवाई शुन्य; दिमाग की बत्ती जलाओ आंदोलन-डाॅ.गणेश ढवळे
बीड/वार्ताहर
बीड जिल्हाप्रशासनातील आधिका-यांना वृक्षलागवड संदर्भात इव्हेंट करण्याची हौस असल्याचे एकंदरीतच दिसुन येते ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या आदेशावरून बीड जिल्ह्य़ात ७३ लाख ३४ हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट दिले होते त्याचे पुढे काय झाले या संदर्भात पाठपुराव्यानंतर खरी परिस्थिती लक्षात येते. सामाजिक संघटना यांच्या सहकार्याने वृक्षलागवड संदर्भात जनजागृती करणा-या जिल्हाप्रशासनाने वनविभाग, सामाजिक वनीकरण,रोहयो आदि. ठिकाणी कागदोपत्रीच वृक्षलागवड संदर्भात आधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्हाप्रशासनाच्या डोक्यात प्रकाश पडावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ५ सप्टेंबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पणत्या पेटवून "दिमाग की बत्ती जलाओ "आंदोलन करण्यात येणार आहे.
वृक्षलागवड "इव्हेंट " चे नियोजन मात्र वनविभागातील व रोहयो अंतर्गत वृक्षलागवड गैरव्यवहार प्रकरणात कारवाईचे नियोजन नाही
बीड जिल्हाप्रशासन दि.११ सप्टेंबर रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त बीड शहरापासुन ते बिंदुसरा धरणापर्यंत बिंदुसरा नदीच्या दोन्ही काठावर प्रत्येकी ८ किलोमीटर अंतर लांबीच्या परीसरात जवळपास साडे चार हजार वृक्षलागवड एकाचवेळी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी नियोजन समिती सभागृहातील आढावा बैठकीत रोहयो उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,तहसिलदार बीड सुहास हजारे,आदि.आधिका-यांनी वृक्षलागवड मोहिमेच्या बाबत नियोजन व रूपरेखा आखण्यात आल्याचे सांगितले. मात्र शासनाचा कोट्यावधी रूपये खर्च करून वनविभागातील व रोहयो अंतर्गत वृक्षलागवड गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करताना दिसुन येते.
जिल्हाप्रशासनाकडुन वृक्षतोड मग कोणत्या आधिकाराने वृक्षलागवड मोहीम राबवणार??
बीड जिल्ह्य़ातील जिल्हा प्रशासनाकडुन वारंवार वृक्षतोड करण्यात आली आहे उदाहरणार्थ दि.१४ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ५० वर्षाचे कडुनिंब झाड तोडण्यात आले तर दोन दिवसानंतर जिल्हा व सत्र न्यायालयासमोरील झाडे तोडण्यात आली,दि.२३ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा क्रिडा संकुल येथील कार्यालय परिसरात तर दि.३० मार्च २०२२ रोजी शासकीय विश्रामगृहातील २५ झाडांची कत्तल करण्यात आली. त्याचबरोबर दि.१४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तहसिल कार्यालय समोरील झाडे तोडण्यात आली तर दि.२९ ऑगस्ट २०२२ रोजी ज्या दिवशी वृक्षलागवड मोहीम संदर्भात आढावा बैठकीच्या पुर्वसंध्येला सार्वजनिक बांधकाम विभाग बीड कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडुन कसलीही परवानगी न घेताच वृक्षतोड केली. म्हणजेच वर्षभरात जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा क्रिडा संकुल,शासकीय विश्रामगृह,तहसिल कार्यालय ते सार्वजनिक बांधकाम कार्यालय परिसरात वृक्षतोड करण्यात आली. मग प्रश्न पडतो यांना खरंच वृक्षलागवड मोहीमेचा नैतिक आधिकार आहे काय???
सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्त यांच्या आदेशावरून पर्यावरण दिनानिमित्त केलेल्या तक्रारीनंतर लाख ३४ हजार वृक्षलागवडीचे ऑडीट करा
दि.५ जुन २०२२ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी बीड जिल्ह्य़ासाठी ७३ लाख ३४ हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट दिले होते. वास्तविक वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडे तेवढी रोपं देखील उपलब्ध नव्हती. सामाजिक वनीकरण व वन विभाग याठिकाणी प्रभारी आधिकारी कारभार पाहतात. किती वृक्षलागवड झाली?किती रोपं जिवंत आहेत? रोपवाटिकेत रोपांची संख्या किती??याविषयी चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्त यांना करण्यात आली आहे.
जिल्हाप्रशासनासाठी "दिमाग की बत्ती जलाओ "आंदोलन -डाॅ.गणेश ढवळे
बीड जिल्हाप्रशासनातील आधिका-यांना खरंच वृक्षलागवड मोहीम ही लोकचळवळ बनवायची असेल तर वनविभाग तसेच रोहयो अंतर्गत वृक्षलागवड गैरव्यवहार प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची गरज असून शासकीय योजना काटेकोरपणे राबविण्यात आल्या तर सामाजिक संघटना,आणि सामाजिक उपक्रमा"अंतर्गत वृक्षलागवड करण्याची गरज भासणार नाही केवळ इव्हेंट करण्यापेक्षा शासकीय योजना कठोर निर्णय घेऊन राबविण्यात याव्यात यासाठी जिल्हाप्रशासनाची "दिमाग की बत्ती जलाओ आंदोलन दि.५ सप्टेंबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पणत्या पेटवून करण्यात येणार आहे.
