निषेध मोर्चात झेंडे, छत्र्या, गमजे, रुमाल व परिधानही काळे घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हा - शेख मोहसीन

निषेध मोर्चात झेंडे, छत्र्या, गमजे, रुमाल व परिधानही काळे घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हा - शेख मोहसीन
बीड/प्रतिनिधी
बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणातील दोषींची कारागृहातून सुटका, अल्लाह, रसूल आणि कुरआन वर हेतूपुरस्सर अर्वाच्य भाषेत करण्यात येणाऱ्या उपद्व्यापांच्या निषेधार्थ दिनांक १५ सप्टेंबर २०२२ गुरुवार रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होणाऱ्यांनी झेंडे, छत्र्या, गमजे, रुमाल असल्यास परिधानही काळे घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, आपल्या भारत देशात काही देश विघातक लोक हिंदू-मुस्लिम मध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी जाणून बुजून हेतूपुरस्सर अल्लाह, रसूल आणि पवित्र कुरआन बद्दल वारंवार अपशब्द वापरून दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कुरापती संपूर्ण भारत देशात बंद व्हायला हव्यात तसेच गुजरात मधील बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणातील आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींना त्यांची शिक्षा माफ करून कारागृहातून सोडून देण्यात आले. एवढेच नव्हे तर कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांचे हार-तुरे घालून अशाप्रकारे सन्मान व सत्कार करण्यात आले जसे काही या ११ जणांनी विश्व करंडक जिंकून आणला. या सर्व कुरापती इस्लाम धर्म व मुस्लिमांच्या विरोधात जाणून-बुजून केल्या जात आहेत. जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या संविधानाचा देश म्हणून अशा कुरापतींचा तीव्रपणे निषेध करावे तेवढे कमीच आहे. म्हणून मुस्लिम समाजाकडून १५ सप्टेंबर रोजी जिल्हा कचेरीवर काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चात प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.