दिग्दर्शक अर्जुन गुजर यांच्या हस्ते विजय जायभाये यांचा सत्कार

दिग्दर्शक अर्जुन गुजर यांच्या हस्ते विजय जायभाये यांचा सत्कार
मांडवेवाडी/वार्ताहर
बीड जिल्ह्यातील मांडवेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत कवी भेट उपक्रमाला भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी चे संस्थापक लेखक विजय जायभाये व बीड जिल्हाध्यक्ष बारकु आघाव यांनी भेट दिली. यावेळी लगन चित्रपटाचे दिग्दर्शक अर्जुन गुजर व शाळेचे मुख्याध्यापक नाकपुरे यांनी उपस्थितीतांचा सत्कार केला.
साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी संस्था म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या संस्थेचे समाजातील विविध स्तरांमधून नेहमीच कौतुक होत असते. संस्थेची स्थापना झाल्यापासून अतिशय कमी वेळात उत्तम प्रकारचे कार्य या संस्थेच्या वतीने पहायला मिळत आहे. विविध स्पर्धा, कवीसंमेलनने, सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शन शिबीरे अशा उपक्रमांच्या माध्यमातून ही संस्थने महाराष्ट्रभर आपला विस्तार केला, विजय जायभाये व विशाल सिरसट या दोन तरूणांना संस्थेची स्थापना केली. अनेक नवोदितांना संस्थेने व्यासपीठ निर्माण करून दिले.
या प्रसंगी कवी विजय जायभाये व बारकु आघाव यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. लगन चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीला एक सामान्यातला असामान्य दिग्दर्शक लाभला असे विजय जायभाये यांनी सांगितले. या प्रसंगी बारकु आघाव, व मुख्याध्यापक नाकपुरे सर उपस्थित होते .
