आडत मार्केट समोरील रोडचा पुन्हा एकदा भुमिपुजन;पण रोड कधी होणार?-शेख सलमान

Beed

आडत मार्केट समोरील रोडचा पुन्हा एकदा भुमिपुजन;पण रोड कधी होणार?-शेख सलमान

शहरात नारळ फोडगॅग पुन्हा सक्रिय !

बीड/प्रतिनिधी

शहरातील पुन्हा एकदा नारळ फोडगॅग सक्रिय झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत असुन एकाच रोडचे पुन्हा-पुन्हा भुमिपुजन करून लोकांना लाॅलीपाॅप देण्याचं काम केला जात आसल्याची चर्चा शहरभर चालु असुन प्रत्यक्षात रोड च्या कामाला सुरूवात कधी होणार? असा प्रश्न शेख सलमान यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की,शहरातील काकु नाना आडत मार्केट समोरील रोडची आवस्था खुप बिकट झाली नागरिकांकडून वारंवार निवेदन देण्यात आले,आंदोलन ही करण्यात आली सांगण्यासारखी गोष्ट महणजे काका -पुतण्या ची नारळ फोडगॅग ने देखील कित्येकदा भुमिपुजन केले मात्र कामाला सुरूवात झाली नाही आणि आज पुन्हा या रोडचा आमदार साहेबांनी भुमिपुजन करून फक्त लाॅलीपाॅप दिला का हे पाहणं गरजेचा आहे कारण आगामी निवडणुक तोंडावर आलेली आहे आणि जनतेला या काका-पुतण्या राजकारण कडुन चुकलं त्यामुळे या नारळ फोडगॅग काका- पुतण्याला त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही असे शेख सलमान यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Sharing

Visitor Counter