अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेश प्रक्रिया मोफत मार्गदर्शन शिबिर- बीड जिल्हा रोटरी कॉप्स चा उपक्रम

Beed

अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेश प्रक्रिया मोफत मार्गदर्शन शिबिर- बीड जिल्हा रोटरी कॉप्स चा उपक्रम

बीड/प्रतिनिधी

नुकताच एम एच टी सीईटी चा निकाल लागला असून, राज्यातील इंजिनिअरिंग, फार्मसी व इतर अनेक कोर्सेस ची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. साधारणपणे एक महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारी ही प्रवेश प्रक्रिया आहे. पुर्णतः ऑनलाइन व क्लिष्ट असलेल्या या प्रक्रियेबद्दल , बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांना सम्पूर्ण माहिती नसते. अर्धवट माहितीमुळे बरेच जण फॉर्म भरताना चुकतात व बऱ्याच प्रसंगी विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते किंवा पालकांचेही आर्थिक नुकसान होते.

त्यामुळे बीड जिल्हा रोटरी कॉप्स व बीड जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबच्या वतीने एक मोफत ऑनलाइन सेमिनार आयोजित केला आहे. ज्यामध्ये इंजिनिअरिंग व फार्मसी याची सम्पूर्ण प्रवेश प्रक्रिया, लागणारी कागदपत्रे, विविध शासकीय योजना व स्कॉलरशिप, आगामी काळात विविध शाखांमधील करिअरच्या संधी, ब्रँच व कॉलेज निवडतांना घेण्याची काळजी या सर्वांबद्दल यामध्ये सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.बीड येथील जोशीज मॅथस क्लासेस चे संचालक प्रा सुनिल जोशी हे या सर्व प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.

 

हा ऑनलाईन सेमिनार गुगल मीट च्या पोर्टल वर शुक्रवार दि 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता घेतला जाणार आहे, तो जॉईन करण्यासाठी गुगल मीटवर  

https://meet.google.com/scj-kkya-muc  

हा कोड किंवा लिंक चा वापर करावा.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी या सेमिनारसाठी ऑनलाईन उपस्थित रहावे, असे आवाहन बीड जिल्हा रोटरी कॉप्स चे अध्यक्ष रो संतोष पवार, कार्याध्यक्ष रो दीपक कर्नावट, सचिव रो संतोष मोहिते व उपाध्यक्ष रो नीलकंठ साबळे 

यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter