मासांहारी खाद्यपदार्थाच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची जैन संस्थांची मागणी हास्यास्पद--उत्तरेश्वर कांबळे

Beed

मासांहारी खाद्यपदार्थाच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची जैन संस्थांची मागणी हास्यास्पद--उत्तरेश्वर कांबळे

आष्टी/प्रतिनिधी

आपल्या देशात कोणाचा आहार काय असावा कोणी कोणते कपडे परिधान करावेत हे स्वातंत्र्य असुन मासांहारी खाद्यपदार्थाच्या जाहिरांवर बंदी घालण्याची याचिका तिन जैन संस्थांनी केली होती.दरम्यान याचिका करत्यांना मा.न्यायालयाने मासांहराच्या जाहिराती बघायच्या नसतील तर टिव्ही बंद करा असे.म्हणून चांगले फटकारले आहे.ही जैन संस्थांची मागणी निव्वळ हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया भीम आर्मीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी दिली आहे अधिक बोलताना कांबळे म्हणाले की अशी याचिका करणे खरच दुस-याच्या खाण्यापिण्याच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे.भारतात धार्मिक स्वातंत्र्य आहे.कोणी आपल्या धर्माचे नियम दुस-या धर्माच्या लोकांवर लादू नये.जैन धर्मातील साधू मुनी खुलेआम नग्र फिरतात त्याबद्दल आजवर कोणीही वाच्छता केलेली नाही.त्यांच्या धर्माबद्दलच्या रूढी पंरपंरेबाबत इतर धर्मातील लोकांनी कधीही वाईट प्रतिक्रिया दिली नाही.

 खरतर जैन दिगंबर साधु मुनींच्या विरोधात देशातील महिलांनी सार्वजनिक ठिकाणी लैंगिकतेचे प्रदर्शन करतात म्हणून खटले दाखल करायला पाहिजेत.जैनांनी मांसाहाराचा फार त्रास करून घेऊ नये आणी त्यांच्या शाकाहाराचा त्रास कुणाला देऊ नये.असा खोचक टोला कांबळे यांनी लगावला आहे..

Sharing

Visitor Counter