मराठमोळ्या अल्ताफ शेख यांची चंदेरी दुनियेत भरारी

मराठमोळ्या अल्ताफ शेख यांची चंदेरी दुनियेत भरारी
पुणे येथे सुरू केली फिल्ममेकर्स अकॅडमी
पुणे/प्रतिनिधी
बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्याचे जावई आणि सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले मराठमोळे अल्ताफ दादासाहब शेख यांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण करावे याप्रमाणे ग्रामीण भागातून पुढे येत मायमराठी, सांस्कृतिक व शिक्षण क्षेत्रात मोठे नाव असलेल्या पुणे सारख्या जिल्ह्यात आपल्या मेहनतीने व इच्छाशक्तीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःच्या कामाने ठसा उमटविला. एक दिग्दर्शक, कथा, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, गझलकार आणि अभिनेता म्हणून नाव कमविल्यानंतर चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर बनवू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना आपल्यासारख्या हाल-अपेष्टा सोसावे लागू नये. गेल्या दहा वर्षात जो संघर्ष अल्ताफ शेख यांनी केला तो संघर्ष किंवा त्या हाल-अपेष्टा उदयोन्मुख कलाकार व तंत्रज्ञांना सोसावे लागू नये या हेतूने त्यांनी फिल्ममेकर्स अकॅडमीची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून त्यांना चांगल्याप्रकारे व रीतसर चित्रपटसृष्टीच्या प्रत्येक क्षेत्राचे शिक्षण मिळावे याकरिता फिल्ममेकर्स अकॅडमी सुरू केली. याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, पुणे येथील पिंपरी चिंचवड भागात असलेल्या वाकड व परिसरातील लोकांसाठी फिल्म मेकर्स अँकेडमी चा प्रारंभ वर्ल्ड बुक रेकाँर्ड आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अल्ताफ दादासाहब शेख यांनी काळाची व लोकांची गरज ओळखून वाकड येथे फिल्ममेकर्स अँकेडमी चा प्रारंभ केला. सदर अँकेडमी चे उद्घाटन जयप्रकाश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एडिटींग डिपार्टमेंट चे प्रमुख कुमार सर, डायरेक्शन डिपार्टमेंट चे प्रमुख हर्ष राजे, कास्टिंग डिपार्टमेंट चे प्रमुख महादेव शिरोळकर सर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या अँकेडमी मध्ये प्री प्रोडक्शन काय असते, शूटिंग साठी ऑन फ्लॉवर कसे जायचे, अभिनय कसा करायचा, कॅमेरा प्रेसिंग कसं करायचं, चिञपटाची कथा, पटकथा, संवाद कसे लिहावे, कलाकाराची निवड कशी करावी, गाण्यांची निवड कशी करावी, शूटिंग करण्यासाठी लोकेशन कसे निवडावे, सिनेमाची आर्ट प्रॉपर्टी कशी ठरवावी, कलाकारांच्या कपड्यांची निवड कशी करावी, चिञपटाचे पोस्ट प्रोडक्शन कुठे आणि कसे करावे, चिञपटाचे प्रमोशन कसे करावे, चित्रपट थिएटर ला कसा लावायचा, सिनेमा डिजिटल मीडियावर कसा विकायचा. या सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. जवळजवळ ७०० स्केअर फुट जागेमध्ये पूर्ण सुविधा उपलब्ध करून देऊन फिल्ममेकर्स अकॅडमीची निर्मिती करण्यात आली आहे अशी माहीती अल्ताफ दादासाहब शेख यांनी दिली.
फिल्म मेकर्स अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी महादेव कासवटे निवृत्त महा बँक अधिकारी, अशोक शिर्के निवृत्त डीवायएसपी अँटी करप्शन ब्युरो, भावी नगरसेवक मोहसीन भाई, कांबले, अभिनेत्री दिव्याश्री, सचिन, शितल इंगवले, कॉस्च्युम डिझायनर संगीता चौधरी, सीमा जाधव, अभिनेत्री सोनाली ओंबळे, निलीमा कदम, सिबीआय अधिकारी कुमार रामजी, व रिंकू कुमारी, अभिषेक चौरे किरण घोडके, नबी शेख, पञकार सचिन ननावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
