शासकीय इतमामात शेख अन्वर यांना शेवटचा निरोप

शासकीय इतमामात शेख अन्वर यांना शेवटचा निरोप
बीड/प्रतिनिधी
लाखो युवकांवर राज्य करणारा कांन्सटेबल शेख अन्वर यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रात्री साडेआठच्या दरम्यान धक्कादाय घटना घडली.या घटनेमुळे परिसरातील हळ-हळ व्यक्त करण्यात येत होता.
जिल्हा पोलीस दलातील पो.कॉ.शेख अन्वर शेख अब्दुल रौफ (वय ३५) यांचा काल रात्री बंदोबस्तावर असतांना मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. आज दुपारी शेख अन्वर यांचा शासकीय इतमामात शहंशाहवली दर्गाह परिसरातील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने हवेत फैरी झाडून पो. कॉ. शेख अन्वर यांना सलामी देण्यात आली. जनाजा नमाज आणि दफनविधीसाठी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान शेख अन्वर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. चाँदणी चौक, भालदारपुरा या भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवुन शेख अन्वर यांना श्रध्दांजली अर्पन केली. शेख कुटूंबियांच्या दुःखात बीड प्रसार परिवार सहभागी आहे.
