वाहतुक शाखेचे नियोजन शून्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी 

Beed

वाहतुक शाखेचे नियोजन शून्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी 

बीड/वार्ताहर 

शहरातील अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता सुभाष रोड परिसरातील नागरिक अर्ध्या तासापेक्षा वाहतुक कोंडीत अडकल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला यामुळे नागरिक वाहतुक शाखेचा नियोजन नसल्यामुळे वाहतुक कोंडी झाल्याची चर्चा करत होते.

बीड शहरातील अनेक ठिकाणी देवी बसल्यामुळे व तोंडावरच सन आल्याने नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी पाहण्यासाठी मिळते सुभाष रोड परिसरातील कपड्याची खरेदी तसेच भाजी मंडई येथील भाजी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहण्यास मिळाली परंतू येथील वाहतुक सुरळीत करण्यासाठी एक ही पोलिस कर्मचारी नसल्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली होती यावरुन भलत्याच वेळेला येथे वाहतुक पोलिस पाहण्यास मिळतो परंतू सणासुदीच्या मौक्यावर पोलिस कर्मचारी का नाही? असा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत होता. ज्यावेळी ट्रॅफिक नसते तेव्हा येथे कर्मचारी उपस्थित राहून गाड्या पाकडताना, चालण फडताना दिसतात मग वाहतुक कोंडीच्या वेळेवर कर्मचारी कुठे गायब झाले? असा देखील प्रश्न नागरिकांकडून विचारला जात असून वाहतुक शाखेच्या नियोजन शून्यामुळे ही वाहतुक कोंडी निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांत पाहण्यासाठी मिळाली.

Sharing

Visitor Counter