बीड जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डामध्ये कोरोना संशयित तरुणाचा मृत्यू!

बीड जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डामध्ये कोरोना संशयित तरुणाचा मृत्यू!
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्हा रूग्णालयात एका संशयित कोरोना रूग्णाचा उपचार चालु असताना आज त्याचा आयसोलेशन वॉर्डामध्ये मृत्यु झाल्याने बीड मध्ये खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील एक कुटूंब ३१ मे रोजी मुंबईहून गावी आले. यादरम्यान सदरील कुटूंबाचा प्रवासात एका कोरोना बाधित रुग्णासोबत संपर्क आला. ते मातकुळी येथे येताच आरोग्य विभागाने पती-पत्नी व दोन मुलांचा जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेतला. यात तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला तर सदरील ३२ वर्षीय तरुणाचा अहवाला अनिर्णीत राहिला, तर दुसर्या वेळीही अहवाल अनिर्णित आला. त्यामुळे रविवारी रात्रीही तिसऱ्यांदा त्या व्यक्तीचा स्वॅब घेतला. मात्र सोमवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. आज येणाऱ्या 23 स्वॅबमध्ये त्याचा अहवाल देखील येणार आहे दोन वेळा स्वॅबचा काहीच निष्कर्ष आला नसल्याने आज पुन्हा एकदा रिपोर्ट च्या प्रतिक्षेत आहे. आता तिसर्यांदा पाठववलेला त्याचा स्वॅबचा रिपोर्ट काय येतो याकडे बीडकरांचे लक्ष लागले आहे.
