जिल्हारुग्णालयात परिचारिकेला मारहाण ?

Beed

जिल्हारुग्णालयात परिचारिकेला मारहाण ?

जिल्हा रुग्णालयात महिला परिचारिकांची सिक्युरिटी उघड्यावर !

बीड/वार्ताहर 

एकीकडे जिल्हा रुग्णालयात चांगल्या प्रकारे उपचार मिळवा म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे हे अहोरात्र प्रयत्न करताना दिसत आहेत तर दुसरीकडे रुग्णालयात टुकार गिरी करणार्‍या तसेच नशा करून दादा गिरी करण्यासाठी येणार्‍या लोकांचा मोकाट वावर पाहण्यास मिळतो. यामुळे महिला नर्स यांना काम करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो हे मात्र स्पष्ट आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री दहा च्या सुमारास एका परिचारिकेला नातेवाईकांनी मारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली अणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या परिचारिकेला संरक्षण करण्यासाठी एक ही गार्ड नसल्याचा समोर आल्याने परिचारिकांच्या सिक्युरिटी वर प्रश्न चिन्ह निर्माण झाला.रात्री नशा करून रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या कुठे तरी थांबली पाहिजे जेणेकरून परिचारिका यांना काम करण्यास अडथळा निर्माण होणार नाही. जिल्हा रुग्णालयात असलेले गार्ड मिस्टर इंडिया सारखे गायब असतात. रात्री अकरानंतर एक ही गार्ड पाहण्यास मिळत नाही यामुळे परिचारिका यांना येणार्‍या लोकांना तोंड द्यावा लागतो नातेवाईकांकडून मारहाण सह शिव्या देखील सहन कराव्या लागतात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे नाही तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

Sharing

Visitor Counter