अधिकारी आणि गुत्तेदार यांचे संगमत खपवून घेणार नाही -आ. बाळासाहेब आजबे

अधिकारी आणि गुत्तेदार यांचे संगमत खपवून घेणार नाही
-आ. बाळासाहेब आजबे
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
मतदारसंघात बंदारे यांची दुरवस्था झालेली आहे.या बंदाऱ्याची दुरुस्ती होऊन गेट टाकण्यात यावेत.मतदारसंघातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत नियमानुसार या रस्त्याची दुरुस्ती संबंधित ठेकेदारांनी केली पाहिजे.त्यासाठी संबधीत ठेकेदारांना तत्काळ नोटिसा काढाव्यात यापुढे बैठकीला प्रतिनिधी चालणार नाहीत आपल्या विभागाची माहिती घेऊनच बैठकीला उपस्थित राहावे असे सांगत खुंटेफळ साठवण तलाव करण्यासाठी सर्वतोपरी मी प्रयत्न करीत आहे.या प्रकल्पातील कुटुंब निश्चिती आणि पुनर्वसन हे काम मर्यादित वेळेतच झाले पाहिजे अशी तंबी देत मतदारसंघातील विकास कामात अधिकारी आणि गुत्तेदार यांचे संगमत खपवून घेणार नाही असा इशारा बोलताना आ. बाळासाहेब आजबे यांनी दिला.
आष्टी तहसील कार्यालयतील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विकासकामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी तहसीलदार वैभव महिंद्रकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे,गटविकास अधिकारी सुधीर भागवत, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, नायब तहसीलदार शारदा दळवी,पो.नि.माधव सुर्यवंशी,अण्णासाहेब चौधरी, परमेश्वर शेळके,
काकासाहेब शिंदे,महादेव महाजन,सुनील नाथ,राम खाडे,पंस सदस्य संदीप अस्वर हे उपस्थित होते.
यावेळी आरोग्य,कृषी,वनीकरण, शिक्षण,बँक, जलसिंचन, जलसंधारण, पाणीपुरवठा, महावितरण, वनविभाग,पोलीस प्रशासन, सार्वजनिक विभाग,नगरपंचायत, तहसिल कार्यालय, भूमी अभिलेख, जि. प.कार्यालय ल.पा.कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चाकरून बोलताना आ. आजबे म्हणाले की सध्या कोरोना महामारी आजारामुळे सर्व लोक भयभीत झाले आहेत. त्यासाठी योग्य मार्ग काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, सध्या आरोग्य विभागात कर्मचारी कमी असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. आष्टी,पाटोदा, शिरूर ग्रामीण रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आष्टी येथे लवकरच शंभर खटांचे उपजिल्हारुग्णालय मंजूर करणार आहे. आष्टीला उपजिल्हा रुग्णालाय व्हावे,कड्याला ग्रामीण रुग्णालय व्हावे ,अशी मागणी आहे आपण मुंबईला गेल्यावर संबधीत मंञ्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.पाणी कमी असल्यामुळे सिताफळ ,संञा शेती वाढविण्याची गरज आहे असे आ.बाळासाहेब आजबे यांनी आवाहन केले.
पाऊसपाणी येणारच आहे. तलाव पाण्याने भरुन वाहणार आहे आशी सकारात्मक दृष्टी ठेवा. पाच पाच वर्षे बंधा-याचे कामे पुर्ण होऊनही काही ठेकेदारांनी गेट का बसविले नाहीत? ज्या बंधा-यांना गेट बसविलेले नाहीत तेथे संबधीत ठेकेदारांना गेट आणायचे तात्काळ पञ द्यावेत.तीन तीन कोटी रु खर्चुन बंधारे केले पण गेट नाहीत ही दुरावस्था आहे.आपण बंधारे गेटसाठी विशेष निधी मागणार आहोत असे आ.आजबे म्हणाले.मी राजकारणात आल्यापासुन आष्टी -खडकत व खडकत ते आष्टी या रस्त्यावर कोट्यावधीचा खर्च दाखविला जातोय. रस्ता होईना असे चक्क आ.बाळासाहेब आजबे म्हणाले.
शाखा अभियंता चौधरी हेच गुत्तेदारी करीत आहेत.दोन वर्षापुर्वी झालेल्या पीएमजीएस वाय योजनेतंर्गत झालेल्या रस्त्यावर खड्डे पडले संबंधीत ठेकेदारांना संबंधित
आष्टी तालुक्यातील चार महसुल मंडळात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे.धामणगांव-४० मि.मी.,आष्टी -३६ मि.मी.,धानोरा -२२ मि.मी. टाकळसिंग २१ मि.मी.,कडा -१९ मि.मी.,पिंपळा -१९ मि.मी.,दौलावडगाव -१८ मि.मी.असा पाऊस झाला आहे.
तालुक्यातील तीन मंडळात सध्यातरी पेरणीयोग्य पाऊस नाही.कृषी सेवा केंद्रांत गर्दी होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात यशस्वी झालो आहोत.७० टक्के शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी केले आहेत असे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी सांगीतले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे म्हणाले की,चेकपोस्टवर तपासणी कडक केली कारण जामखेडवरुन जाणाऱ्या अॕब्युलन्समधुन होणारे गैरप्रकार उघडकीस आले.या आढावा बैठकीस उपअभियंता अशोक खेडकर, उपअभियंता पी. ए.तळेकर, तालुका अधिकारी संतोष कोठुळे,मुख्याधिकारी नीता अंधारे,बालविकास अधिकारी उद्धव सानप,डाॕ.राज शेख,सोपान पवार,जगन्नाथ ढोबळे ,हरिभाऊ दाहातोंडे ,अर्जुन काकडे,सुधीर जगताप उपस्थित होते.
