बीडमध्ये सुपर स्टार सर्कसचा आज शुभारंभ  

Beed

बीडमध्ये सुपर स्टार सर्कसचा आज शुभारंभ  

बीड/प्रतिनिधी

बीड येथील पंचशील नगर भागातील सरस्वती शाळेच्या सर्कस ग्राऊंडावर सुपर स्टार सर्कलसचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अविनाश जाधव, संदिप उबाळे, संतोष थोरात, गणेश थोरात, विजय लहाने यांच्या उपस्थितीमध्ये आज शनिवारी सायंकाळी 7 वाजता होणार असल्याचे सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी सांगितले.

या सर्कसमध्ये 80 कलाकार असून त्यामध्ये 35 महिलांचा सहभाग आहे. प्राणीमुक्त सर्कस आहे. मात्र विविध कलाकृती यामध्ये दाखवल्या जाणार आहेत. याचा जास्तीत जास्त शहर वासियांनी लाभ घ्यावा असे आवाहन सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी केले आहे.

 

Sharing

Visitor Counter