शिक्षण समाज परिवर्तनाचे एकमेव माध्यम

शिक्षण समाज परिवर्तनाचे एकमेव माध्यम
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेशदिन उत्साहात : बाळासाहेब जावळे
बीड/प्रतिनिधी
शिक्षण समाज परिवर्तनाचे एकमेव प्रभावी माध्यम आहे. त्याशिवाय समाजाला बदलणे अथवा व्यक्तीला घडविणे कठीण आणि अशक्य आहे. असे प्रतिपादन प्रा.बाळासाहेब जावळे यांनी व्यक्त केले.
बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यता प्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे सोमवार दि.7 नोव्हेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेशदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रा.बाळासाहेब जावळे बोलत होते.
यावेळी संस्थेतील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा.बाळासाहेब जावळे म्हणाले की, या देशाचे उद्धारकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 मध्ये शाळेत प्रथम प्रवेश घेतला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत की, विद्यार्थी हा प्रज्ञा, शील,करुणा या गुणांनी युक्त असला पाहिजे. एवढेच नव्हे तर बाबासाहेबांच्या मते ज्ञान ही एकमेव अशी गोष्ट आहे की, मानव मात्रास स्वाभिमानाची जाणिव करुन देते.जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका रुपयांची भाकरी घ्या आणि दुसऱ्या रुपयांचे पुस्तक घ्या. कारण भाकरी जगण्यास मदत करेल आणि पुस्तक जिवन जगण्याचा मार्ग शिकवित राहील. असे मत प्रा.बाळासाहेब जावळे यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे सचिव राहुल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र प्रमुख प्रा.अविनाश वडमारे, ग्रंथपाल सचिन काकडे, सहाय्यक ग्रंथपाल अनिल डोंगरे, वरिष्ठ लिपिक विनोद जोगदंड, कनिष्ठ लिपिक दिलीप गायकवाड, प्रा.श्रीधर आघाव, प्रा.भरत खेत्री, सहाय्यक प्रा.अर्चना आठवले, सहाय्यक प्रा.कोमल जगताप, सहाय्यक प्रा.दिवाकर तुपारे, प्रा.अमोल, सहाय्यक गजानन खेत्री, व्हिडीओग्राफर राहुल शिंदे, सहाय्यक दिपालिताई निर्मळ, सहाय्यक जयश्रीताई तायड यांनी मोलाचे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा.प्रतीक्षा हिवरकर, आभार प्रा.अमोल क्षीरसागर यांनी केले.
