सेन्टेन्स सोशल सेंटरच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

सेन्टेन्स सोशल सेंटरच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यातील शेतकरी महिला मेळाव्याचे आयोजन सेन्ट अँन्स समाजसेवा केंद्र बहिरवाडी यांच्या वतीने भव्य महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास महिला शेतकऱ्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून सेन्टेन्स सोशल सेंटर या संस्थेचा महिला शेतकऱ्यांकडून आभार व्यक्त करून त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध समस्याचे निवेदन देण्यात आले.
शेतक-यांनी कमी खर्चाची, बिनकर्जाची व शाश्वत शेती पध्दती नेमकी कशी करावी हे या कार्यक्रमात शिकवण्यात आलं व गेल्या कित्येक वर्षांपासून सेंट अन्स सोशलसेंटरच्या वतीने शेतकर्यांना जनजागृती करून शेतकर्यांना सेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहन केल जात.
जनतेने सेंद्रीय अन्नसेवनाचे महत्व समजून रसायनमुक्त अन्नाची मागणी केली पाहिजे. रासायनिक शेती करणे सोडल्यानंतर पहिल्याच वर्षी पूर्वीएवढे निव्वळ उत्पन्न मिळवता येते पण त्यासाठी पिकाचे आयुष्य, विविध कालावधीत लागणा-या मूलद्रव्याची गरज, कीड व रोग प्रादुर्भावाची वेळ इत्यादी बारकाईने अभ्यासून त्यावर वेळेवर सेंद्रीय पध्दतीचा वापर केला पाहिजे. यावेळी मार्गदर्शन करण्यात आले होते तर महिला शेतकऱ्यांची समस्या शासनादरबारी मांडण्यासाठी सेंटेंस सोशल सेंटरच्या संचालिका अॅड. अँनी जोसेफ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले त्यात शेतकऱ्यांचे वेगवेगळे समस्या निवेदनात मांडले होते.
