जिल्हा जात पडताळणी समितीच्या वतीने निवडणूक कामाविषयी समतादुत प्रशिक्षण संपन्न

Beed

जिल्हा जात पडताळणी समितीच्या वतीने निवडणूक कामाविषयी समतादुत प्रशिक्षण संपन्न

बीड/वार्ताहर 

जिल्हा जात पडताळणी समितीने सन 2022-23 होणा-या ग्रामपंचायत निवडणूकीचे जात पडताळणी प्रस्ताव तालुकास्तरावर समतादूत मार्फत स्वीकारण्याचे प्रस्तावित असून या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील समतादूत यांचे एक दिवशीय कार्यशाळा, प्रशिक्षण जात पडताळणी कार्यालय बीड येथे संपन्न झाले.

 

      या कार्यशाळा प्रशिक्षणात निवडणूक जात पडताळणी प्रस्तावासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे, ऑनलाईन प्रस्ताव तपासणे , महत्वाचे पुरावे कोणते, निवडणूक प्रस्ताव स्वीकारण्याची कार्यपध्दती याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष दिलीप जगदाळे, जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपायुक्त एस. आर. मकरंद यांनी केले. या कार्यशळेस समतादूत प्रकल्प अधिकारी, समतादूत ज्ञानोबा मात्रे, नानाभाऊ गव्हाणे, तुकाराम पिंप्रिकर, संजय गुजर, ज्ञानेश्वर ढगे, पुरोषोत्तम स्वामी, भीमा कंधारे, वर्षा देशमुख, व्यंकटेश जोशी, रविंद्र नांदे, आणि मधूसुदन मस्के उपस्थित होते.  

 

महाविद्यालयाच्या प्राचार्य व लिपीक, समानसंधी केंद्राचे प्रमुख यांची बैठक संपन्न

जिल्हा जात प्रमाण्पत्र पडताळणी समिती बीड व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड पॅटर्न राबविण्यासाठी 11 वी व 12 वी महाविद्यालयाचे प्राचार्य व लिपीक, समानसंधी केंद्राचे प्रमुख यांची बैठक मिलिया महाविद्यालय बीड येथे आयोजित करण्यात आली. सदरील बैठकीस जात पडताळणी समितीच्या उपायुक्त एस.आर. मकरंद तसेच जिल्हा परिषदेचे सहाय्यक शिक्षण उपनिरिक्षक श्री देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती.

विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये, बीड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी जास्तीत जास्त 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, सीईटी देणारे, डिप्लोमा तृतीय वर्ष विद्यार्थ्यानी अर्ज सादर करण्याचे आवाहन जातपडताळणी समितीच्या उपायुक्त आर. एस. मकरंद यांनी केले.

Sharing

Visitor Counter