नगर पालिकेतून ६० लाखाची मुळ संचिकाच गायब?

Beed

नगर पालिकेतून ६० लाखाची मुळ संचिकाच गायब?

"त्या" कन्स्ट्रक्शन कंपनीला कुणाचा अभय!

बीड/वार्ताहर

बीड शहरातील रस्ते क्रॉसिंग साठी तब्बल ६० लाख ७० हजार रुपयांची एक निविदा काढण्यात आली होती. या संबंधीचे काम झाले की नाही ? याबद्दल शंका असतानाच बिल सुध्दा पास करण्यात आल्याचे समजते मात्र या निविदेची मुळ संचिकाच गायब झाल्याची चर्चे नगर परिषद परिसरात ऐकण्यास मिळते.नगर पालिकेतून एखाद्या निविदेची संचिका कोणी आणि का गायब केली? या संबंधी आतापर्यंत चौकशी झाली की नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. जर संचिका गायब झालेली असेल तर चोरीचा गुन्हा दाखल होईल का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

काही वर्षापुर्वी दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मदारी नावाचा चित्रपट आला होता. यामध्ये एक चांगला डायलॉग होता तो म्हणजे सरकार आहे म्हणून भ्रष्टाचार आहे, असे नसून भ्रष्टाचार आहे म्हणून सरकार, प्रशासन आहे. असाच काहीसा प्रकार बीडच्या नगर पालिकेत गेली अनेक वर्ष होताना दिसत आहे. बीड नगर पालिकेकडून काढण्यात येणार्या बहुतांश कामांसाठी एकच कन्स्ट्रक्शनचा येथील अधिकारी आणि कर्मचारी आर्थिक लाभासाठी आग्रह करत असल्याची चर्चा नगर पालिकेत नागरिकांकडून केली जात आहे.

त्या कन्स्ट्रक्शनकडून फारच दर्जेदार काम होत असणार आहेत. त्याशिवाय त्या कन्स्ट्रक्शनवर संपुर्ण नगर पालिकेची मर्जी बसलेली नसणार? हे उघड आहे. बोगस प्रकारचे कामे करणे, कामे न करताही बिले उचलले, अधिकार्‍यांना वेगवेगळ्या प्रकारे गिफ्ट देवून त्यांना खिशात ठेवणे, त्यांच्याकडून मनमानेल त्या पध्दतीने कामे करवून घेणे, संचिकाच गायब करण्यासाठी पुढाकार घेणे आदि प्रकार करणाऱ्या ती कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणजे बीडच्या नगर पालिकेला लागलेली वाळवी असून त्या कंपनीच्या विरोधात आतापर्यंत अनेक तक्रारी दाखल झालेल्या असताना सुध्दा त्याविरुध्द साधा एक कागद तयार करायला सुध्दा नगर पालिका प्रशासनाला जर वेळ मिळत नसेल तर हे खूप दुर्दैव म्हणावे लागेल .

 

 

Sharing

Visitor Counter