कारवाई करणाऱ्यावर कारवाई कोण करणार?

कारवाई करणाऱ्यावर कारवाई कोण करणार?
नियम फक्त सामन्य माणसालाच आहे का?
बीड/वार्ताहर
बीड मध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे पण कारवाई करणारेच कायदा मोडत असतील तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत असून नियम फक्त सामान्य माणसालाच आहे का? असा प्रश्न सामान्य माणसाकडून विचारला जात आहे.
आज शिवाजी चौकातील ट्रॅफिक पोलिस कर्मचारी गाडी चालवत असताना मोबाईल वर बोलत होता आणि या चौकात ट्रॅफिक पोलिस कर्मचारी दररोज किती तरी लोकांवर कारवाया करतांना दिसतात परंतु या पोलिस कर्मचार्यांना गाडी चालवत मोबाईलवर बोलणारा कर्मचारी दिसला नाही का? यांना नियम लागु होत नाही का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आल्यापासून जिल्ह्यात बऱ्याच पैकी सुधारणा पाहण्यास मिळत आहे परंतु काही पोलीस कर्मचारी सुधारणा करण्याऐवजी बिघाडण्याचे काम करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते यामुळे पोलीस दलाचा नाव खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पोलिस अधीक्षकांनी या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
