बीड येथे जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती प्रभातफेरीत युवक विद्यार्थ्यांसह विविध स्वयंसेवी संस्थांचा मोठा सहभाग

बीड येथे जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती प्रभातफेरीत युवक विद्यार्थ्यांसह विविध स्वयंसेवी संस्थांचा मोठा सहभाग
बीड/वार्ताहर
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग व जिल्हा रुग्णालय बीड यांच्या संयुक्तरित्या जागतिक एड्स दिनानिमित्त सकाळी जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. याप्रसंगी सर्व उपस्थितांना एड्समुक्त जिवन जगण्याची शपथ घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडचे सदस्य सचिव सिध्दार्थ गोडबोले, तसेच विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक, अशासकीय संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. या रॅलीत विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या.
जनजागृती रॅली शिवाजी पुतळा, कारंजा, बलभिम चौक, धोंडीपूरा, माळीवेस, सुभाष रोड,साठे चौक, बस स्टॅड, शिवाजी पुतळा या मार्गाने सामाजिक न्याय भवन समाज कल्याण येथे समारोप झाला. समारोप प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे यांनी एचआयव्ही/एड्स यामधील फरक सांगितला तसेच यावर्षीचे घोषवाक्य ‘आपली एकता आपली समानता, एचआयव्हीसह जगणा-या करिता’ याच्या स्पष्टीकरण करुन एचआयव्ही मुक्त जीवन जगण्याचा तरुणानां संदेश दिला. उपस्थितांना एचआयव्ही/ एड्स जनजागृतीपर वाटप करण्यात आले तसेच सहभागी शाळा, महाविद्यालय,अशासकीय संस्थांना सहभाग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण विकास मंडळ, लिंक वर्कर स्किम बीड यांच्या मार्फत आपली समानता या विषयावर समता कला पथकाच्या मीना कांडेकर यांनी एचआयव्ही/एड्स विषयावर गीताव्दारे प्रबोधन केले. प्रभातफेरी यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे सुहास कुलकर्णी,एफ. आर. फारोकी, नवनाथ चव्हाण,डॉ. एन. बी. पटेल, डॉ. अरुण राऊत, जर्नाधन माचपल्ले,फ.सी. इनामदार, महादेव इंगळे, अमोल घोडके,राजश्री हिवरेकर,शेख सलीम, दिलीप औसरमल, संतोष नाईनवरे, विशाखा सुर्यवंशी, संतोष डोलारे,सुमित्रा गलधर, अंजना घुगे, विठ्ठल राठोड,माया शिंदे, राजेंद्र पानसंबळ इत्यादी कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. पोलीस बँड पथकांच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.