परळी तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी विकास नागरगोजे तर तिसऱ्यांदा व्हाईस चेअरमन पदी गोविंद मुंडे यांची बिनविरोध निवड

Beed

परळी तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी विकास नागरगोजे तर तिसऱ्यांदा व्हाईस चेअरमन पदी गोविंद मुंडे यांची बिनविरोध निवड

परळी तालुका खरेदी विक्री संघावर आ.धनंजय मुंडे यांचे वर्चस्व

परळी/प्रतिनिधी

परळी तालुका खरेदी विक्री संघाची माजी मंत्री धनंजय मुंडे, वाल्मीक कराड मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ व चेअरमन, व्हाईस चेअरमन, यांची बिनविरोध निवड दि.5 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आली. यात चेअरमन पदी विकास नागरगोजे तर व्हाईस चेअरमन पदी सलग तिसऱ्यांदा गोविंद बालाजी मुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

 

 संचालक मंडळ वैयक्तिक गटामध्ये गोविंद बालाजी मुंडे, सुरेश मदनराव मुंडे, दत्तात्रय ढवळे, विष्णू माधवराव फड, लक्ष्मण मुरकुटे, सोसायटी मतदारसंघ भगवानराव कांदे, अतुल मुंडे, बालासाहेब नामदेवराव आघाव, भटक्या विमुक्त जाती जमाती विकास नागरगोजे, अनुसूचित जाती जमातीमध्ये सुभाष पुजारी, मागासवर्गीय शिवाजी भुतांगळे, महिला वैशाली शिवरत्न मुंडे, इंदुमती बालाजी मुंडे यांची संचालक म्हणून निवड झालेली आहे.

 

         सहाय्यक निबंध कार्यालयाचे निवडणूक अधिकारी जगदाळे साहेब,एस के चव्हाण, चांदणे, पंडीत अण्णा, कुंभार म्हणून काम पाहीले. यावेळी शिवरत्न मुंडे, बापू दादा नागरगोजे, कल्याण मुंडे, दत्ता गिरी, राजाराम काचगुंडे, दौंड, महेश मुंडे, नरेश मुंडे, शुभम नागरगोजे आदी उपस्थित होते.सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

Sharing

Visitor Counter