धैर्यशील शिंदे गाजवणार राज्यस्तरीय मैदान

धैर्यशील शिंदे गाजवणार राज्यस्तरीय मैदान
जिल्हा संघात झाली निवड; नाशिकमध्ये होणार स्पर्धा
बीड/प्रतिनिधी
वयाच्या सातव्या वर्षापासून क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या जिमाखाना क्रिकेट क्लबच्या धैर्यशील सुशील शिंदे याची चौदा वर्ष वयोगटाखालील जिल्हा संघात निवड झाली आहे. नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय U-14 क्रिकेट स्पर्धेत तो आता आपली चमक दाखवणार आहे.
बीड येथील जिमखाना क्रिकेट क्लबचा खेळाडू धैर्यशील शिंदे याने यापुर्वी अनेक सामन्यांमध्ये अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिलेला आहे. राज्यस्तरीय संघ निवडीसाठी घेण्यात आलेल्या सराव सामन्यातही त्याने उत्कृष्ट प्रदर्शन करत जिल्हा संघात स्थान मिळवले.ही निवड झाल्याबद्दल बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, सचिव आमेर सलीम, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिमखाना क्रिकेट क्लबचे जुबेर सिद्दीकी, अॅड शेख शफीक, अॅड.सुभाष राऊत, अभिजित बरीदे, प्रा.सचिन उबाळे, जमीर खान, फैज देशमुख, महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिझवान खान, गोपाल गूरखूदे, शेख आरेफ, अतीक कुरेशी, सरफराज मोमीन, सुनील गोपी शेट्टी, अक्षय नरवडे व पठाण शाहरुख यांनी अभिनंदन केले आहे.