टँकरद्वारे पाणी पुरवठा योजनावरील घोटाळ्याची स्थगिती उठवली

टँकरद्वारे पाणी पुरवठा योजनावरील घोटाळ्याची स्थगिती उठवली
विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकार्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश; आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यामध्ये टंचाईग्रस्त क्षेत्रामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे काम वतन ट्रान्सपोर्ट लातूर यांच्याकडे होते. वेळोवेळी यांनी टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा न करता शासनाचे करोडो रूपयाचा भ्रष्टाचार करून सामान्य जनतेस वेठीस धरले होते. या प्रकरणी मागील अधिवेशन काळात आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी सभागृहामध्ये लक्षवेधी मांडली होती. त्यावर पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी बीड जिल्ह्यात पाणी पुरवठा करणारे वतन ट्रान्सपोर्ट लातूरसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करत असणार्या ट्रान्सपोर्टची चौकशी करण्याचे आदेश तातडीने दिले होते. त्यावर औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अडीचशे अधिकारी,कर्मचार्यांचे पथक गठीत करण्यात आले होते आणि चौकशी अंतिम टप्प्यात असतांना दि.25 नोव्हेंबर 2022 रोजी राज्य शासनाने स्थगिती दिली होती. पण आता ही स्थगिती उठविण्यात आली असून विभागीय आयुक्तांनी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी दि.11 ऑक्टोबर 2022 रोजी मा.पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात आ.संदीप भैय्या क्षीरसागर प्रधान सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड, उपसचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,मुंबई, कार्यकारी अभियंता जि.प.बीड, सहा.लेखा संचालक विभागीय आयुक्त कार्यालय,औरंगाबाद, कक्ष अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,मुंबई यांची बैठक झाली होती. या बाबत सविस्तर चर्चा होवून खालील कार्यवाही करणे बाबत आदेश देण्यात आले होते. मुद्दा क्रमांक विभागीय आयुक्त,औरंगाबाद यांना सादर केलेला चौकशीचा अहवाल चर्चेसाठी ठेवण्यात आला. मंत्री महोदय यांनी तो अहवाल स्विकारून प्रधान सचिव,पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांना कार्यवाहीचे आदेश दिले. मुद्दा क्रमांक दोन सदरील प्रकरणी ग्रामसेवक गेवराई यांनी विभागीय आयुक्त यांना माहिती दिलेला नाही या बाबतीत मंत्री महोदय यांनी तिव्र नाराजी व्यक्त करून संबंधिताविरूद्ध तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड यांना देण्यात आले आहे. मुद्दा क्रमांक तीन सदरील प्रकरणी कंत्राटदाराचा यामध्ये सहभाग स्पष्ट झाला असल्याने त्यास काळ्या यादीत टाकणे बाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड यांना देण्यात आले. मुद्दा क्रमांक चार विभागीय आयुक्त,औरंगाबाद यांच्या अहवालामध्ये झालेली अनियमितता तपासुन त्यात जे-जे अधिकारी, कर्मचारी सहभागी असल्याचे आढळून येतील त्यांच्यावर विभागीय तात्काळ चौकशी करण्यात यावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड यांना देण्यात आले आहे. अनियमितता विचारात घेता पोलीस यंत्रणे मार्फत तात्काळ गुन्हा दाखल करणे बाबतचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड यांना देण्यात आले होते. सदरील घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात असतांना राज्य शासनाने दि.25 नोव्हेंबर 2022 रोजी स्थगिती दिली होती. परंतु आता ही स्थगित दि.9 डिसेंबर 2022 रोजी उठविण्यात आली असून विभागीय आयुक्तांनी बीड जिल्हाधिकारीसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविणार्या या कंत्राटदाराला आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे नक्कीच कारागृहाची हवा खावी लागणार असून जनतेच्या तोंडचे पाणी पळविल्यास काय होते हे मे.वतन ट्रान्सपोर्ट लातूर यांच्यासह असे पाणी घोटाळे करणार्यांना समजेल.
