उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहन क्रमांकासाठी नविन मालिका सुरु

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहन क्रमांकासाठी नविन मालिका सुरु
बीड/वार्ताहर
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात यापूर्वी दुचाकी करीता चालू असलेली एम एच 23 बी एफ ही मालिका संपत आली असून दुचाकी वाहनांकरिता एम एच बी जी ही नविन मालिका दि. 15 डिसेंबर 2022 ते 19 डिसेंबर 2022 पर्यंत सुरु करण्यात येत असून आवश्यक रकमेचा धनादेश दि. 15 ते 19 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत परिवहनेत्तर शाखेमध्ये खिडकी क्र. 01 वर धनादेश जमा करावेत, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बीड यांनी कळविले आहे.
या मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप महाराष्ट्र मोटार वाहन नियम परिवहन आयुक्तांच्या परिपत्रकानुसार करण्यात येणार आहे. एकाच आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जदारांची यादी दि. 20 डिसेंबर 2022 रोजी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येईल. त्यानंतर अर्जदार यांचे अतिरिक्त रकमेचा मागणी ध्नाकर्ष दि. 21 डिसेंबर 2022 रोजी जाहिर लिलावापूर्वी कार्यालयात बंद लिफाप्यासह सादर करावा. जाहिर लिलाव दि. 21 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बीड यांच्या कक्षात घेण्यात येईल.
