वंचित बहुजन युवा आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अनुरथ वीर व पदाधिकारी यांचा सत्कार

Beed

वंचित बहुजन युवा आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अनुरथ वीर व पदाधिकारी यांचा सत्कार

बीड/प्रतिनिधी

वंचित बहुजन युवा आघाडीच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मेजर अनुरथ वीर महासचिव ऍड. राजेंद्र कोरडे, उपाध्यक्ष अमोल शिंदे व युवा कार्यकारणी जिल्हा पदाधिकारी यांचा सत्कार मराठवाडा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अशोक हिंगे पाटील यांच्या लोढा कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांना फेटा बांधुन, पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी सत्कार ला उत्तर देताना नवनिर्वाचित युवा जिल्हाध्यक्ष मेजर अनुरथ वीर यांनी सर्व ज्येष्ठ व आजी माझी व सोबतच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडी युवकांची संघटना उभारणी करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली, तसेच युवक जिल्हा महासचिव ऍड. राजेंद्र कोरडे यांनी माझा जो सन्मान व निवड केली आहे त्याबद्दल पक्षश्रेष्ठीचे व जिल्ह्यातील नेत्यांचे आभार मानले आहेत.अधिक जोमाने पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सत्काराला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष अशोक हिंगे पाटील जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जोगदंड, पुरुषोत्तम वीर, ज्येष्ठ नेते तथा माजी तहसीलदार अनंतराव सरवदे, एस.एस. सोनवणे, बालाजी जगतकर, राजेशकुमार जोगदंड, जिल्हा महिला अध्यक्षा एड.अनिता चक्रे, पुष्पाताई तुरुकमारे, आदी पदाधिकारी सत्कार ला उपस्थित होते. नवनिर्वाचित वंचित बहुजन युवक आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Sharing

Visitor Counter